Headlines

शाहरुख खानने का मानले जॉन सीनाचे आभार? म्हणतो ‘मी गाणं पाठवतो तुम्ही…’

[ad_1]

Shahrukh Khan Reacts To John Cena : बॉलिवूडवर आपली छाप सोडणाऱ्या किंग खानची क्रेझ गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणांमध्ये देखील शाहरुख खानला (Shahrukh Khan) फॉलो करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त भारतातच नव्हे तर आखाती देखील तसेच युरोपात देखील शाहरुखच्या गाण्यावर आजही ठेका धरला जातो. क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत अनेक खेळाडू देखील शाहरुखला भेटण्यासाठी उत्सुक असतात. अशातच आता  डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार जॉन सीना (John Cena) देखील शाहरूख खानचा जबरा फॅन असल्याचं पहायला मिळालं होतं. जॉन सीनाचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आता किंग खानने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये जॉन सीनाने शाहरुख खानच्या दिल तो पागल है या चित्रपटातील काही ओळी गात असल्याचं दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पहलवान गुरविंदर सिहरा याने सुपरस्टार जॉन सीनाचा एक व्हिडीओ शूट केला. त्यामध्ये जॉन सीनाची ओळख सिहराने शाहरुख खानचा फॅन अशी करून दिली आहे. त्यावेळी त्याने जॉन सीनाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणं ‘भोली सी सूरत, आँखो मैं मस्ती..’, हे गाणं गाताना दिसत आहे. गुरविंदर सिहराने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्हाला जॉन सीनाला हिंदी सिनेमामध्ये पहायचं आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. त्यावर आता किंग खानने कमेंट केली आहे.

काय म्हणतो किंग खान?

शाहरुखच्या चाहत्यांना जॉन सीनाची फिल्म स्टाइल खूप आवडली. या व्हिडिओवर शाहरुखने प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखने इंस्टाग्रामवर लिहिलंय, “तुम्हा दोघांचे आभार… मला ते खूप आवडलं आणि जॉन सीना तुझ्यावर आम्ही प्रेम करत राहू… मी तुम्हाला माझी नवीनतम गाणी पाठवणार आहे आणि मग तुम्ही दोघंही त्यावर व्हिडिओ बनवाल, असं म्हणत शाहरुखने जॉन सीनाची प्रशंसा केलीये.

दरम्यान, शाहरुख खान नुकताच डंकी या सिनेमात झळकला होता. तर त्याआधी जवान सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. आता भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या सॅल्यूट बायोपिकमध्ये शाहरुख खान देखील असल्याचे म्हटलं जातंय. तो राकेश शर्माची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर संजय लीला भन्साळी Izhaar नावाचा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान दिसणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता शाहरुखची क्रेझ आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *