Headlines

Shah Rukh Khan Luxury Car: ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने स्वत:लाच दिली खास भेट! जाणून घ्या या कारची किंमत

[ad_1]

Shah Rukh Khan Buys Luxury Car: तो आला… त्याने पाहिलं… त्याने जिंकून घेतलं सारं काही… याच शब्दांमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आतापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करता येईल. मागील काही वर्षांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शाहरुखने ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाच्या माध्यमातून दमदार पुनरागमन केलं आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने अनेक विक्रम नोंदवले. शाहरुखचे आगामी डंकी आणि जवान या चित्रपटांचीही तुफान चर्चा असून हे चित्रपट सुद्धा हिट ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान एकीकडे शाहरुखच्या ‘पठाण’ची आणि आगामी चित्रपटांची चर्चा असतानाच किंग खानने स्वत:लाच एक रॉयल गिफ्ट दिलं आहे.

झालं असं की, शाहरुख त्याच्या महागड्या आलिशान कारमधून रविवारी त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्यामधून बाहेर पडला. शाहरुख ज्या गाडीमधून बाहेर पडला ती रोल्स-रॉयल्स कंपनीची कलिनन ही कार होती. या कारवरील लोगोने आणि स्पेशल 555 क्रमांकाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. शाहरुख या गाडीत बसून ‘मन्नत’मध्ये परततानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखने नुकतीच खरेदी केलेली ही रोल्स-रॉयल्स कलिनन कार सध्या भारतामध्ये विकली जाणारी रोल्स-रॉयल्स कंपनीची सर्वात महागडी कार असल्याचे समजते. या कारची शोरुममधील अंदाजित किंमत ही 8 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. या कारची एकूण किंमत 10 कोटींहून अधिक असल्याचे समजते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या कारमधून शाहरुख बंगल्यामध्ये जाताना दिसत आहे.

शाहरुखकडे अनेक आलिशान कार्स आहेत. केवळ कारच नाही तर शाहरुखकडे असणाऱ्या अनेक गोष्टी या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख एका कार्यक्रमामध्ये 5 कोटी रुपयांचं घड्याळ घालून दिसला होता. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट नुकताच अनएडीटेड सिन्ससहीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, अशुतोष राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खाननेही पाहुणा कलाकार म्हणून छोटी भूमिका केलेली आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *