Headlines

‘ते सेटवर मारहाण करायचे आणि…’; अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

[ad_1]

Vanangaan Movie : मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ममिता बैजूनं दिग्दर्शकावर गंभीर आरोप लगावले आहेत. ममितानं सगळ्यात आधी बालासोबत त्याच्या ‘वनंगान’ मध्ये काम केलं होतं. पण त्यानंतर तिनं हा चित्रपट सोडला. ममिता बैजूनं सांगितलं की बाला तिला सेटवर ओरडायचे आणि मारहान देखील करायचे. ‘वनंगान’ या चित्रपटामध्ये ममिका बैजूला लीड अभिनेत्री म्हणून साइन करण्यात आलं होतं. तर चित्रपटात सूर्या महत्त्वाच्या भूमिकेत होता. मात्र, त्यानंतर दोन्ही कलाकारांनी हा चित्रपटमध्येच सोडला.

सूर्यानं बाला यांच्या या चित्रपटाला सोडण्याचं कारण त्यांच्यात असलेले क्रिएटिव्ह डिफरन्सेस. मात्र, ममिकानं बैजूनं हा चित्रपट तिच्यावर झालेल्या हानामारीमुळं झाला होता. यावेळी तिनं 94.3 क्लब एफएममध्ये मुलाखत दिली होती, त्यावेळी या सगळ्या गोष्टींविषयी सांगितलं. ममिता बैजूनं सांगितलं की ‘चित्रपटात विलादिचम्पातु नावाची एक गोष्ट आहे, त्याला पाहून मी विचारलं की मी म्हणजेच माझी भूमिका चित्रपटात बराच काळापासून त्याचा सराव करते का? की असं दाखवण्यात येणार आहे की पहिल्यांदा ती याचा सराव करणार आहे. त्यांनी मला सांगितलं की माझ्या भूमिकेला याचा खूप अनुभव आहे असं दाखवण्यात आलं आहे. तर अशा परिस्थितीत मला त्यासाठी एक्सपर्ट असं गरजेचं आहे ना? कारण परफॉर्म करताना ड्रम वाजवत गाणं गावं लागेल आणि यासाठी एक खास अंदाज देखील असतो.’

ममिता बैजूनं पुढे सांगितलं की त्यानंतर बालानं एका महिलेकडे इशारा केला, जी एक विलादिचम्पातु कलाकार होती. बालानं मला सांगितलं की ती कशी परफॉर्म करते हे मी पाहावं, जसं मी पाहिलं त्यानंतर ते म्हणाले ठीक आहे आणि मग म्हटलं की आपण टेकसाठी जातोय. मला आश्चर्य झालं कारण मी त्यासाठी तयार नव्हते. 

ममिता बैजूनं पुन्हा एकदा सांगितलं की मला हे देखील कळलं नाही की ते काय गात होते. ते शिकण्यासाठी मला तिनवेळा प्रयत्न करावा लागला. या सगळ्यात ते मला अनेकदा ओरडले देखील. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की ते सेटवर असेच असतील आणि काहीही बोलतील, ओरडतील. त्यांनी मला सल्ला दिला की कितीही वाईट वाटलं तरी मी त्या गोष्टीला गांभीर्यानं घेऊ नये. त्यामुळे सेटवर असताना असं काही होईल याची मी आधीच तयारी केली होती. ते मला मारायचे देखील. सूर्या सरांना याविषयी आधीच माहित होतं कारण त्यांनी आधी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्यातील बॉन्डिंग चांगली होती आणि मी यासगळ्यासाठी नवीन होते. 

हेही वाचा : रणबीर-आलियाच्या 21 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ फोटोवरुन वाद; लोक म्हणाले, ‘हे फार विचित्र वाटतंय’

ममिता बैजूनं हे सांगितलं नाही की तिनं या कारणामुळेच चित्रपट सोडला, पण हा खुलासा केल्यानंतर नेटकरी ही दिग्दर्शक बालावर संतापले आहेत. ममिता बैजू नुकतीच ‘प्रेमवू’ या चित्रपटात दिसली होती. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *