Headlines

सीमा देव यांच्या निधनानं खचली सून; भावनिक पोस्ट वाचून तुम्हालाही रडू येईल

[ad_1]

Smita Deo Emotional Post on Seema Deo: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. गेली अनेक वर्ष सीमा देव या आपल्या दर्जेदार अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी ही सर्वाधिक लोकप्रिय आहे. मागच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आणि काल सीमा देवही आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हा खूपच मोठा धक्का होता. रमेश देव आणि सीमा देव यांची दोन्ही मुलंही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अंजिक्य देव आणि अभिनय देवही दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते आहेत. सासू आणि सूनेचे नाते हे फार अनोखे असते. त्यामुळे त्यांच्या नात्यातील गंमत ही खास असते. सीमा देव यांच्या निधनानंतर त्यांच्या धाकट्या सूनबाई स्मिता देव यांनी त्यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

स्मिता देव या उत्कृष्ट शेफ आणि खवय्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे रेसिपीचे व्हिडीओ हे खूप व्हायरल होताना दिसतात. कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई या पुस्काच्या त्या लेखिका आहे. मध्यंतरी अभिनेत्री सीमा देव आणि रमेश देव यांनी ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमातून हजेरी लावली होती. त्यावेळी रमेश देव आणि सीमा देव यांनी त्यांच्या या पुस्तकाचे आणि स्मिता देव यांचे भरभरून कौतुकही केले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली होती. यावेळी अभिनय देव यांच्या पत्नी स्मिता देव यांनी सीमा देव यांच्यासाठी इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी वाचून त्यांच्यातील आणि सीमा देव यांच्यातील भावूक नाते जगासमोर येते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की त्यांनी या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलं आहे?

हेही वाचा : ‘मैंने प्यार किया’सह 100 हून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे गीतकार देव कोहली कालवश

स्मिता देव म्हणतात, ”सासूबाईंचे निधन झाले आहे यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. त्यातून त्या केवळ माझ्या सासूबाईच नव्हत्या तर त्या माझ्या आईच होत्या. त्या खऱ्या अर्थानं माझ्या सर्वांधिक जवळच्या व्यक्ती होत्या. मी जेव्हा अभीला (अभिनय देव) डेट करत होते. तेव्हा त्यांना असं वाटलं की ही ‘बांद्राची छोकरी’ इतकी मॉडर्न, या घरात कसं काय जुळवून घेईल? मग जसा काळ सरला… जेव्हा माझं आणि अभिनयचं लग्न झालं त्यानंकर मात्र त्यांना माझ्याबद्दल जाणून घेऊन खूपच आश्चर्य वाटले आणि मग त्यांना सिद्ध करून दाखवले. त्यानंतर आम्ही खरोखरच फार घनिष्ठ मैत्रीणी झालो. 

त्या मला म्हणाल्या होत्या की, त्यांना माझ्यासारखीच मुलगी हवी होती आणि त्यांनी मला त्यांच्या मुली इतकेच प्रेम दिले. 

जेव्हा मी आणि त्या अभिनय कामावरून कधी परत येतोय याची वाट पाहायच्या तेव्हा त्या सोफ्यावर बसून त्यांच्या सासू-सूनच्या सिरियल्स पाहायच्या आणि मग त्यांच्या मांडीजवळ बसलेले असायचे. त्यावेळी त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवायच्या आणि मग त्या दिवसाचा सगळा थकवा निघून जायचा. 

त्यानंतर आम्हा दोघींना वेगळं करणार कोणीच नव्हतं. आम्ही साडीसाठी खरेदी करायला जायचो. त्याचसोबत आम्ही दोघी भाजी आणि इतर समानही आणायला जायचो. जेव्हा मी भाजी घेण्यासाठी बाहेर पडते तेव्हा हे भाजीवाले त्यांची विचारपूस केल्याशिवाय राहत नाहीत. आणि ते मला केळी द्यायचे व ते अजिबातच त्यांचे पैसे घ्यायचे नाहीत. मला माहितीये की हे ते फक्त त्यांच्यासाठी आहे. आम्ही आमची फेवरेट डीश खायचो. तेव्हा त्या त्यांच्या बालपणाबद्दल, रमेश देव यांच्याबद्दल, त्यांच्या संघर्षांबद्दल सांगायच्या. त्यांच्या सासूबाईंबद्दलही त्या मला सांगायच्या. आमचे सर्वात धाकटे प्रताप काका त्यांना वहिनी नाही तर आईच म्हणायचे. त्यांनी त्यांच्या मुलांवर, नातवंडांवर खूप प्रेम केले. त्यांनी आमच्या संपुर्ण कुटुंबाची मुठ फार चांगल्या प्रकारे घट्ट बांधली होती. 

त्यांच्यासाठी तो एक धक्का होता जेव्हा मी आणि अभिनयनं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही याला सामोरे जाऊ शकलो नाही. आम्ही त्या दोघांनाही आमच्यासोबत राहण्याचे सांगितले होते. परंतु त्या दोघांना त्यावेळी त्यांचा कम्फर्ट झोन हा फार महत्त्वाचा होता असं मला वाटतं. पण शेवटी त्या त्यांच्या आयुष्याच्या त्या पटलावर आल्या होत्या जेव्हा त्या स्वत:लाही ओळखू शकत नव्हत्या…”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *