Headlines

पंजाबमधील गुरुद्वार पाहून भारवला मराठी अभिनेता, म्हणाला ‘आपल्याकडे अशी व्यवस्था…’

[ad_1]

Milind Gawali Visit Punjab : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळींनी या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारलं आहे. सध्या मिलिंद गवळी हे एका शूटच्या निमित्ताने पंजाबला गेले आहेत. त्याचा एक अनुभव मिलिंद गवळींनी सांगितला आहे. 

मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते पंजाबच्या फतेहगड साहेब गुरुद्वाराची झलक दाखवताना दिसत आहे. त्याबरोबरच त्यांनी तिथे जाण्याचा एकंदर अनुभव कसा होता? याबद्दलही पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

काल पटियाला शूटिंग नंतर परत येत असताना हा एक योग आला, फतेहगड साहेब गुरुद्वाराला जाण्याचा. सकाळी पहाटे साडेचार वाजता जेव्हा हॉटेलवरनं निघालो तेव्हा एक रेल्वे क्रॉसिंग ला आमची गाडी थांबली होती त्याच्याच बाजूला हे गुरुद्वारा होतं सुंदर लाइटिंग केलेलं होतं गुरुद्वाराला, अगदी अमृतसरचं गोल्डन टेम्पल सारखं मला ते भासलं , माझ्याबरोबर एक दुसरा मॉडेल पण गाडीमध्ये होता रोहित, आम्ही चौकशी केली तर ड्रायव्हरने सांगितलं की 24 तास हे गुरुद्वारा चालू असते आणि 24 तास त्या गुरुद्वारामध्ये लंगर चालू असतो, मग मी आणि रोहित ने ठरवलं शूटिंग संपल्यानंतर परत येताना आपण या गुरुद्वाराला थांबूया आणि तिथे माथा टेकाया,
ठरल्याप्रमाणे शूटिंग संपल्यावर आम्ही परत येत असताना तिथे थांबलो, माझ्यासाठी हा सुंदर अनुभव होता, याआधी मी नांदेडच्या गुरुद्वारा मध्ये जाऊन आलो होतो, त्यावेळेसही मी असाच भारावून गेलो होतो, हे सरदार लोकं आपल्या गुरुद्वारे ची खूप काळजी घेतात, अतिशय स्वच्छ ठेवतात, सतत भजन चालू असतं, खूप मनापासून श्रद्धेने, काही गोंधळ न घालता, धक्काबुक्की न करता, अगदी शांतपणे वाहेगुरूची प्रार्थना करत असतात. (आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था शेगावच्या गजाननमहाराजांच्या मंदिरामध्ये आहे, शेगावला दोन वेळा जायचा माझा योग आला होता),

एकदा माझी आई वैष्णव देवीला गेली असताना रस्त्यामध्ये दरड कोसळली होती. आणि ती घरी सुखरूप परत आल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या मदतीला धावून येणारे सरदार लोकं होती , ती सांगत होती रस्त्यामध्ये दरड कोसळली होती आणि हे सरदार लोकं खूप मदत करत होते, रस्त्यात अडकलेल्यांची त्यांनी जेवण पाणी वगैरे देऊन खूप मदत केली ! हा जो गुरुद्वारा आहे तो ,फतेहगढ साहिब हे गुरू गोविंद सिंग यांचा ७ वर्षांचा मुलगा फतेह सिंग याच्या नावावरून आहे, ज्याला त्याचा ९ वर्षांचा भाऊ जोरावर सिंग यांच्यासह मुघलांनी राज्यपाल वजीर खान यांच्या आदेशानुसार जप्त करून जिवंत गाडले होते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीस चालू असलेली मुघल-शीख युद्धे. तिथे त्यांनी त्यांच्या सगळ्या जून्या वस्तू खूप छान संग्रही करून ठेवल्या आहेत, यावेळेला घाईत होतो म्हणून लंगर वगैरे काही खाता आला नाही पण त्यांचा चविष्ट प्रसाद त्यांनी आम्हाला दिला जे आमच्याबरोबर काल्या रंगाचे पक्षी सुद्धा खाण्याकरिता येत होते!, असे मिलिंद गवळी यांनी यावेळी म्हटले. 

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने इतके सुंदर वर्णन, केलेत तुम्ही, की डोल्या समोर तिथले चित्र उभे राहिले अशी कमेंट केली आहे. तर एकाने हे रील पाहून खूप छान वाटले, असे म्हटले आहे. तसेच काहींनी त्यांच्या फोटोचेही कौतुक केले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *