Headlines

Scam Alert! प्लीज, फोन द्या अर्जंट एक कॉल करायचा आहे, स्कॅमर्सचा गुन्हा करण्याचा नवा फंडा

[ad_1]

नवी दिल्लीः मार्केटमध्ये फसवणुकीच्या नवीन नवीन घटना समोर येत आहेत. अनेकदा अनोळखी व्यक्ती आपल्या समोर येवून प्लीज तुमच्या फोन द्या मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, अशी विनंती करते. आपणही माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीच्या हातात आपला मोबाइल देत असतो. परंतु, हा फ्रॉड करण्याची नवीन पद्धत असून तुम्हाला चांगलाच चुना लागू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीवर कोणतीही दया मया न दाखवता फोन देणे टाळणे हेच योग्य ठरू शकते. कारण, अशा काही घटना समोर आल्या असून अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.

असा घडतो फ्रॉड
खरं म्हणजे, अनेकदा आपल्याला अनोळखी व्यक्ती भेटून कॉल करण्यासाठी आपल्या मोबाइलची मागणी करते. परंतु, तुमच्या फोन हातात घेतल्यानंतर ते स्कॅमर्स फोन कॉल फॉरवर्ड मोड मध्ये टाकतात. यामुळे तुमच्या कॉल नंबर डायवर्ट होतात. यासाठी स्कॅमर्स तुमच्या फोनमध्ये *21* किंवा *401* डॉयल करतात. यामुळे तुमच्या नंबरवर येणारी सर्व कॉल्स व मेसेजचा अॅक्सेस स्कॅमर्स आपल्या फोनमध्ये घेतात. नंतर स्कॅमर्स तुमच्या सोबत बँक फ्रॉड करतात. तुमच्या फोनमध्ये येणाऱ्या ओटीटी द्वारे स्कॅमर्स बँक अकाउंट मधून पैसे गायब करतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या हातात मोबाइल देताना काळजी घेणे कधीही चांगले आहे.

कसे कराल कॉल फॉरवर्डला डिअॅक्टिव्ह
तुम्हाला नेहमीसाठी कॉल फॉरवर्ड करायचे असेल तर तुम्ही *#21* कोडचा वापर करू शकता. जर तुम्ही नेहमीसाठी फॉरवर्ड करण्यात आलेल्या कॉलला डीअॅक्टिव्ह करीत असाल तर तुम्ही #21# कोडचा वापर करू शकता.

वाचाः आयफोन वापरताय, पण IPhone मधील I चा अर्थ काय आहे, माहिती आहे?

कॉलिंगसाठी फोन मागितल्यास काय कराल
जर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तर थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. किंवा रिचार्ज संपला आहे. तर त्या व्यक्तीला फोन कॉलिंगसाठी देण्याऐवजी स्वतः त्याचा फोन नंबर डायल करा किंवा त्या व्यक्तीच्या समोर उभे राहून तो कोणता नंबर डायल करतोय, हे पाहा. असे केल्यास तुम्ही मोठ्या संकटापासून वाचू शकता.

वाचाः 200MP कॅमेरा, 180W फास्ट चार्जिंग सपोर्टचा स्मार्टफोन भारतात लाँच, १२ मिनिटात फुल चार्ज

वाचाः जिओ Cattle tracker पासून वेगळ्या डिव्हाइसपर्यंत, यावर्षी लाँच झाले हे टॉप ५ यूनिक गॅझेट्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *