Headlines

आमिरच्या लेकीच्या लग्नाची तारिख आणि ठिकाण ठरलं! ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी

[ad_1]

Aamir khan’s Daughter Ira Khan’s Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. पुढच्या महिन्यात आयरा ही नुपुर शिखरेसोबत ऑक्टोबर मध्ये उदयपुरमध्ये सप्तपदी घेणार आहेत. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम किती दिवसांचा असेल आणि त्यात कोणते कोणते कलाकार हजेरी लावणार याविषयी लवकरच माहिती समोर येणार आहे. इतकंच नाही तर लेकीच्या लग्नासाठी आमिर स्वत: मेहनत घेणार आहे. 

सुत्रांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, आयरा आणि नुपूर 3 ऑक्टोबर 2023 रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. आयरा आणि नुपुर शिखरे उदयपुरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या हा सोहळा तीन दिवसांचा असेल. त्यांच्या लग्नात कुटुंबाच्या जवळील काही लोक आणि जवळचे मित्र-मैत्रिण उपस्थित असतील. त्यांच्या लग्नात जास्त लोकांना आमंत्रित करण्यात येणार नाही. त्यामुळे इंडस्ट्रितील प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

रिपोर्ट्सनुसार, आमिर त्याची लेक आयराच्या लग्नासाठी खूप उत्साही आहे. तर सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, वधूचे वडील खूप जास्त उत्साही आहेत आणि लग्नाची संपूर्ण तयारीत उत्साहानं सहभागी होत आहे. या आधीच्या मुलाखतीत आयरानं नुपूर शिखरेसोबत तिची भेट कशी झाली याचा खुलासा केला होता. नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे आणि त्यांची भेट ही जिममध्ये झाली होती. आयरानं सांगितलं की जेव्हा मी 17 वर्षांची होते तेव्हा पोपॉय (नुपूरला प्रेमानं पोपॉय असं बोलतात) नं मला ट्रेनिंग देनं सुरु केलं होतं. तो सुपरफिट होता. हळू-हळू आम्ही चांगले मित्र झालो आणि त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. 

आयरा विषयी बोलायचे झाले तर ती आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ताची लेक आहे. तर आयरा आणि नुपूरचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संपूर्ण खान कुटुंब सहभागी होतं. दरम्यान, आयारा आणि नुपूर सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. 

हेही वाचा : ‘नसीरुद्दीन शाह वेडे, त्यांना मदतीची गरज!’ विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया

आयरानं तिच्या खासगी आयुष्याविषयी देखील अनेक खुलासे केले होते. आयरा ही कधी डिप्रेशनमध्ये होती हे तिनं सांगितलं होतं. त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतं. इतकंच नाही तर ती इतरांना यातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती करताना दिसते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *