Headlines

समीर वानखेडे आणि राखी सावंत आमने-सामने; अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

[ad_1]

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राखी सावंत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावेळी अभिनेत्री थेट समीर वानखेडे यांना भिडली आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांनी 2023 साली दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन अभिनेत्री विरोधात खटला दाखल केला आहे. काशिफ अली खान यांनी जाणीवपूर्वक खोटी आणि ‘बनावट, निराधार’ विधाने केल्याचा दावाही समीर वानखेडे यांनी केला आहे.

माजी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे नुकतंच बिग बॉस 14 ची स्पर्धक राखी सावंत आणि तिचे वकील अली काशिफ खानच्या विरोधात 11 लाख रुपयांचा दावा करत तिच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. मुंबईतील दिंडोशी येथील सिव्हील कोर्टात याचिका दाखल केली आहे.

अली काशिफ खान यांनी मांडली स्वत:ची बाजू
आपल्या याचिकेत समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे की, राखी आणि अलीने त्यांची प्रतिमा डागाळण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला. समिर यांच्या उत्तरात अली काशिफ खानने सांगितलं की, “कायद्यात असं म्हटलं गेलं आहे की, जेव्हा जनतेच्या हितासाठी पब्लिक सर्वंटबद्दल सत्य बोललं जातं. तेव्हा कोणतीच मानहानी होत नाही. एखाद्याबद्दल काही बोलणं किंवा आपलं मत व्यक्त करणं ही कोणत्याही प्रकारची बदनामी नाही.”

समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, समीर वानखेडे यांनी 2023 साली दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन खटला दाखल केला आहे. यावेळी समीर यांनी असाही दावा केला आहे की, काशिफ अली खान यांनी जाणीवपूर्वक खोटी आणि ‘बनावट, निराधार’ विधाने केली होती. इतकंच नाही तर त्यांनी हे देखील सांगितलं की, अली काशिफ खान जाणूनबुझून मीडियामध्ये अशी विधानं करतात सेलिब्रिटींची प्रतिमा खराब करत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाईदेखील मागितली आहे.

राखी सावंतच्या अडचणीत वाढ
समिर वानखेडेने पुढे असंही म्हटलं की, अली काशिफ खानने  आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँण्डलवरदेखील याचप्रकारचा कटेंट पोस्ट केला होता. त्यांचा हाच कंटेंटनंतर राखी सावंतने शेअर केला होता. या सगळ्यानंतर त्यांच्या प्रतिष्ठेचं अजून नुकसान झालं. आम्ही तुम्हाला सांगतो की, अली काशिफ वकील आहेत.  त्यांनी यापूर्वी आर्यन खान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुनमुन धमेच्या बाजुनं कोर्टात बाजू मांडली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *