Headlines

स्वप्नातील नव्हे, खरी-खुरी राजकुमारी आहे सलमानची ‘ही’ हिरोईन! ‘वयाच्या 13 व्या वर्षीच…’

[ad_1]

Salman Khan’s Actress is from Royal Family : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटानंतर भाग्यश्री एका रात्रीत स्टार झाली. फार कमी लोकांना माहित असेल की भाग्यश्री ही महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेली आहे. इतकंच नव्हे तर ती एका राजघराण्याची राजकुमारी आहे.  तर आज आम्ही तुम्हाला भाग्यश्रीबद्दल काही रंजक गोष्टी सांगत आहोत. ज्या तुम्हाला नक्कीच माहित नसतील. 

भाग्यश्री ही सांगलीतील मराठी राजघराण्यातील आहे. भाग्यश्रीचं पूर्ण नाव भाग्यश्री पटवर्धन असून ती  खऱ्या आयुष्यात राजकुमारी आहे. सांगलीचे चौथे आणि शेवटचे राजे महाराज विजयसिंहराजे पटवर्धन आणि त्यांची पत्नी श्रीमंत अखंड सौभाग्यवती राणी राज्यलक्ष्मी पटवर्धन यांची ती कन्या आहे.

राजघराण्यात जन्म घेणे आणि पूर्वापार चालत आलेला नियम आणि बंधनात राहणे काही सोपे नसते. भाग्यश्री देखील यापासून अस्पर्शित राहिलेली नाही. भाग्यश्रीनं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की राजघराण्यातून येणं तिच्यासाठी काही सोपं नव्हतं. एका मुलाखतीत, भाग्यश्रीनं राजघराण्यातील मुलींना एका विशिष्ट वयात लग्न करण्यासाठी कसा तगादा लावला जातो याबाबत खुलासा केला. ती म्हणाली होती की “मी महाराष्ट्राच्या सांगलीतील एका पारंपरिक रीतिरिवाज पाळणाऱ्या राजघराण्यातून आलेली आहे आणि तीन बहिणींमध्ये मी सर्वात मोठी आहे. आमच्या राजघराण्यातील महिलांनी विशिष्ट वयात लग्न करून संसार सांभाळणे अपेक्षित आहे. त्याशिवाय वयाच्या 13 वर्षी भाग्यश्रीनं साडी नेसायला सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांनी साडी ही तिची आवडती स्टाईल झाली.  

या मुलाखतीत भाग्यश्रीने तिला आणि तिच्या बहिणींना सांगलीचा वाडा कसा मिळाला याविषयी देखील सांगितले. ‘एका प्रकारे आम्ही दुहेरी आयुष्य जगलो. माझा जन्म मुंबईत झाला बालपण देखील इथेच गेले. मुंबईत मी, मधुवंती आणि पौर्णिमा या माझ्या बहिणींसोबत सामान्य आयुष्य जगत होते. पण सांगलीला गेल्यावर काय करावे आणि काय करू नये यासाठी माझ्या बाबांनी काही नियम घालून दिले होते. आठवीत असताना आणि 13 वर्षांची असताना साडी नेसायला सुरुवात केली. आम्ही ज्या पद्धतीने कपडे घालायचो, आमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं लोकांची भेट घेणं यासर्वांमधे एक विशिष्ट शिस्त होती.” 

हेही वाचा : ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात! विकी कौशलशी आहे खास कनेक्शन

तिन्ही बहिणींमध्ये भाग्यश्री मोठी होती त्यामुळे तिच्या आई-वडिलांसाठी ती मुलाप्रमाणे होती. सांगलीला गेल्यावर तिथले लोक काय करायचे याविषयी देखील भाग्यश्रीनं सांगितलं होतं. तिनं सांगितलं की जेव्हा केल्या तिचं कुटुंब जेव्हा सांगलीतील त्या शाही घराला भेट द्यायची तेव्हा लोक त्यांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे यायचे. त्यावेळी वडिलांसमोर लोक काय समस्या सांगत आहेत ते ऐकायची. या शिवाय राजेशाही आयुष्य आणि सामान्य आयुष्यात बॅलेन्स ठेवणं फार कठीण होतं. त्यानंतर लग्न आणि करिअर सांभाळणं देखील सोपं नव्हतं. त्यासाठी देखील तिनं सगळं खूप सांभाळलं. भाग्यश्रीविषयी बोलायचे झाले तर तिचं लग्न हे मारवाडी कुटुंबात झालं आहे. सध्या ती पती हिमालयसोबत तिच्या कौटुंबिक आयुष्याचा आनंद घेत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *