Headlines

सलमान खान-अर्जुनमधील वादावर जाहीरपणे बोलले बोनी कपूर, ‘मला सलमानने फोन करुन सांगितलं की…’

[ad_1]

बॉलिवूडमधील गाजलेल्या वादांमध्ये सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्या वादाचा समावेश आहे. हा वाद इतका टोकाचा आहे की, सलमान खान अर्जुनकडे पाहणंही पसंत करत नाही. विशेष म्हणजे अर्जुन कपूरला सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना फार मदत केली होती. पण या वादाचा परिणाम सलमान खान आणि अर्जुन कपूर बोनी कपूर यांच्या मैत्रीवर झालेला नाही. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सलमान आणि अर्जुनमधील वादावर भाष्य केलं आहे. 

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले आहेत की, “मी पहिली पत्नी मोनापासून वेगळा झालो होतो. पण अर्जुनला अभिनेता व्हायचं आहे हे माझ्या ध्यानी मनीही नव्हतं. सलमान खानने मला फोन करुन, ‘बोनी सर, तो अभिनेता होईल. त्याच्यात ती गुणवत्ता आहे’ असं म्हटलं होतं. तो अभिनेता होईल याची त्याने खात्री केली”.

पुढे त्यांनी सांगितलं की, “सलमान खानने अर्जुनला वजन कमी करायला लावलं. अर्जुनचा प्रश्न असेल तिथे मी सलमान खानला श्रेय देतो. आज त्यांच्याच फार चांगलं नातं नसेल, पण त्याने अर्जुनला सर्वोत्तम दिलं. सलमान खानमुळे तो आज इतका यशस्वी आहे”.

दरम्यान त्यांच्यातील वादाचा परिणाम तुमच्या नात्यावर झाला का? असं विचारण्यात आलं असता बोनी कपूर म्हणाले की, “या वादाचा परिणाम सलमान आणि माझ्या नात्यावर झालेला नाही. मी आजही त्याच्यावर तितकंच प्रेम करतो. त्याच्यासारखे मोठ्या मनाचे लोक फार कमी आहेत. आम्ही जेव्हा कधी भेटतो, तेव्हा प्रेमाने भेट होते. तो मला फार आदर देतो आणि माझ्यावर प्रेम करतो”.

काही महिन्यांपूर्वी अर्जुन कपूर सलमान खानचा ‘टायगर 3’ चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडला होता. सोशल मीडियावर अर्जुन कपूर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसह चित्रपटगृहात आनंद घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. 

दरम्यान अर्जुन कपूर आणि सलमान खानमधील वादाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण अर्जुन कपूरचं मलायका अरोराशी अफेअर असल्याने हा वाद सुरु झाल्याची चर्चा आहे. त्याआधी त्याने सलमानची बहिण अर्पिताला डेट केलं होतं. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. यानंतर तो मलायकाशी नात्यात आला. मलायका सलमान खानचा भाऊ अरबाजची बायको आहे. त्यांचा घटस्फोट झाला आहे. अरबाजने नुकतंच मेकअप आर्टिस्ट शौराशी दुसरं लग्न केलं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *