Headlines

Salman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्

[ad_1]

Salman Khan and Aishwarya Rai In One Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खान सध्या नीता मुकेश अंबानी कल्टरल सेंटरच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) येथे हजेरी लावल्यामुळे चर्चेत आहे. यावेळी सगळ्यात आधी सलमाननं आर्यन खानसोबत आणि नंतर शाहरुखच्या कुटुंबासोबत फोटो काढल्यामुळे चर्चेत आला होता. तर त्यानंतर सलमाननं तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींसोबत फोटो काढला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, सलमान सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं चर्चेत असण्याचं कारण म्हणजे सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांना एका फोटोत नेटकऱ्यांनी स्पॉट केलं आहे. इतक्या वर्षांनंतर त्यांना एकत्र स्पॉट केल्यानं सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे.

व्हायरल होत असलेला हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. यावेळी सलमान खान, शाहरुख खान आणि नीता अंबानी या स्पायडर मॅन फेम टॉम हॉलंड (Tom Holand) आणि त्याची गर्लफ्रेंड जेंडिया (zendaya) या दोघांसोबत पोज देताना दिसत आहेत. दरम्यान, या फोटोत नेटकऱ्यांनी ऐश्वर्या रायला स्पॉट केलं आहे. या फोटोत ऐश्वर्याची पाठ दिसत आहे. ऐश्वर्या आणि आराध्या दोघेही या फोटोत स्पॉट झाले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

व्हायरल होत असलेल्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्याला देखील फोटोसाठी विचारा ती मागेच आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणी ऐश्वर्या आणि आराध्याला या फोटोत स्पॉट केलं का?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या आणि सलमान एका फ्रेममध्ये.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘मागे पाहा मागे ऐश्वर्या.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘फक्त अंबानी सलमान आणि ऐश्वर्याला एका छता खाली घेऊन येऊ शकता.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान आणि ऐश्वर्या बऱ्याच दिवसानंतर एकत्र दिसले.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या सलमानशी बोलली असेल ना.’ 

हेही वाचा : म तुम्हारी दादी हो सकते थें; आराध्यासोबत Rekha यांना पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान, सलमान आणि ऐश्वर्यासोबतच नेटकऱ्यांनी रेखा आणि आराध्याला एकत्र पाहिल्यानंतर त्यावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी म्हटले की ‘रिश्ते में हम तुम्हारी दादी हो सकते थें’ असे रेखा आराध्याला बोलत असतील. तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अमिताभ हे शेवटचा फोटो झूम करून पाहतील.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *