Headlines

Salman Khan : 35 वर्ष 35 दिवसांसारखे..! असा होता सलमान खानचा बॉलिवूडमधील प्रवास; भाईजानने शेअर केला Video

[ad_1]

Salman Khan Share Video : साल होतं 1989…  बॉक्स ऑफिसवर ‘मैंने प्यार किया’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् बॉलिवूडला नवा सुपरस्टार मिळाला. याच सुपरस्टाने पुढील अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. एवढंच काय तर उतरत्या वयात देखील त्याने आपल्या अभिनयाची धाक कमी होऊ दिली नाही. होय, आपण बोलतोय, बॉलिवू़डचा भाईजान सलमान खानविषयी… सलमान खानची (35 years of Salman Khan) बॉलिवूडमधील 35 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच आनंदाच्या क्षणी सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral video) शेअर केला आहे. 

सलमान खान (Salman Khan) अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतो. पण आता भाईजान आनंदोत्सव साजरा करताना दिसतोय. भारदस्त डायलॉग आणि खास शैलीमुळे सलमानचे फॅन फॉलोविंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता त्याचे अनेक फॅन्स त्याची 35 शी साजरी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 35 वर्ष 35 दिवसांप्रमाणे गेले. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार, असं सलमान खान म्हणाला आहे.

पाहा Video

सलमानच्या बॉलिवूड करियर पहायचं झालं तर, त्याने दोन टप्पे पहायला मिळतात… हॅलो ब्रदर, बीबी हो तो ऐसी, तेरे नाम, हम आपके है कोन, नो एन्ट्री, बीबी नंबर 1, मैने प्यार किया, अंदाज अपना अपना, अशा हिट फिल्म सलमानने दिल्या आहेत. तर पार्टनर, रेडी, बॉडिगार्ड, वॉन्टेड, किक, प्रेम रतन धन पायो, बजरंगी भाईजान, एक था टायगर, दबंग सुलतान आणि राधे यासारख्या सिनेमांमध्ये सलमानने दमदार अभिनय दाखवला आहे.

सलमान खानच्या आयुष्यात एक असा काळ होता, जेव्हा तो सुपरस्टार असूनही बेरोजगार होता. सलमान खानचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ देखील सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने सलमान खानचे नशीब उजळलं. यामुळे तो रातोरात सुपरस्टार झाला. 

आणखी वाचा – ‘माझा बाप आहे तो, अख्खं जग रुसेल पण…’ भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी भावूक, पण गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट; पाहा Video

सलमान खानचा टायगर 3 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये पुन्हा एकदा सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची जोडी झळकणार आहे. इमरान हाश्मी, विशाल जेठवा आणि रिद्धी डोगरा यांचा अभिनय देखील पहायला मिळेल. सलमान खान शेवटचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात झळकला होता. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *