Headlines

‘सर्कसमधल्या स्टंटमुळे सलीम खान यांनी लगावली सलमान खानच्या कानशिलात! अरबाज म्हणाला…

[ad_1]

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचे लाखो चाहते आहेत तरी देखील तो एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहतो. आजही त्यांच्याकडून काही चूक झाली तर त्याला त्याचे वडील सलीम खान ओरडतात. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. सलमान हा लहाणपणापासून मस्तीखोर होता आणि त्यामुळे त्याचे वडील समील खान सतत टेन्शनमध्ये रहायचे. याचा खुलासा त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेल खाननं पॉडकास्ट शोमध्ये केला. 

अरबाज खाननं सांगितलं की ‘सलमान खान खूप मस्ती करायचा. या कारणामुळे अनेकदा तो अडचणीत आला आणि वडिलांकडून त्याला ओरडाही मिळाला आहे. अंकितसोबतच्या पॉडकास्ट टाइमआऊटमध्ये अरबाजनं सांगितलं की, सलमान मोठा आहे आणि वडीलही त्याच्या खोडसाळपणामुळे त्याला ओरडायचे. अनेकवेळा त्याला थोडे फटकेही पडले.’

अरबाजनं त्यानंतर पुन्हा एकदा एक किस्सा सांगितला, जेव्हा त्यांचे वडील सलमान खानला सर्कस बघायला घेऊन गेले. तिथेच सलमान स्टंट करु लागला आणि त्यानं हात तोडून घेतला. यानंतर रागावलेल्या सलीम खान यांनी त्याला कानशिलात लगावली. अरबाजनं सांगितलं की ‘वडील सलमानला सर्कसमध्ये स्टंट शो दाखवण्यासाठी घेऊन गेले. तिथे सलमानचं लक्ष एक रॉड असलेल्या बिल्डिंगवर गेलं. तो गपचूप तिथे गेला आणि काही स्टंट करु लागला. या चक्करमध्ये तो पडला आणि त्याचा हात तुटला. तो आम्हाला त्याचा हात दाखवण्यासाठी आला आणि म्हणाला, हे बघा माझ्यासोबत काय झालं.’

अरबाज पुढे म्हणाला की, ‘सलमाननं विचार केला की त्याच्यावर दया करतील, पण वडिलांनी त्याला दोन कानशिलात लगावले आणि म्हणाले हे सगळं करण्याची काय गरज होती? तू पागल आहेस का? याला डॉक्टरकडे घेऊन जा.’ 

हेही वाचा : अ‍ॅडल्ट स्टार सोफिया लियोनीचं निधन, वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अरबाज पुढे म्हणाला की “सलमानला वाटतं की सगळं काही शक्य आहे आणि तो सगळं काही मिळवू शकतो. जेव्हा सलमान मोठा होत होता. अरबाजच्या म्हणण्यानुसार, सलमान मोठा होत होता तेव्हा घरातील सगळ्यांना त्याची चिंता होती, पण त्याचं नशिब बघा वयाच्या 24-25 व्या वर्षी तो स्टार झाला.” लवकरच सलमान विष्णुवर्धन आणि एआर मुरुगदॉस यांच्या अॅक्शनपटात दिसणार आहे. मात्र, अजून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *