Headlines

ऋषी सुनक यांच्या ‘विजय मामा’वाल्या व्हिडीओवर अभिनेत्याची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाला, नमस्कार बेटा…

[ad_1]

ब्रिटनचे (UK) पंतप्रधान बनून इतिहास रचणाऱ्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा ‘विजय मामा’चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर (social media) अधिराज्य गाजवणाऱ्या या व्हिडिओवर मिर्झापूर फेम अभिनेता विजय वर्माची (Vijay Varma) प्रतिक्रिया आली आहे. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या ‘विजय मामा’ला दिलेल्या व्हिडिओ क्लिपवरुन विजय वर्माने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिद्ध शेफ संजय रैनाने (sanjay raina) ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासोबतचा स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये संजय रैना आणि पंतप्रधान ऋषी सुनक विजय मामासोबत (Vijay Mama) व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ऋषी सुनक विजय मामाला ब्रिटनमधील (britain) 10 डाउनिंग स्ट्रीटवर येण्याचे आमंत्रण देत आहेत. युनायटेड किंगडमच्या (UK) पंतप्रधानांचे (PM) निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीट येथे आहे.

पंतप्रधान ऋषी सुनक या व्हिडिओमध्ये, ‘नमस्कार विजय मामा, ‘मी ऋषी, तू कसा आहेस? मला आशा आहे की तू इथे येशील आणि मला भेटशील. तुम्ही इथे आल्यावर तुमच्या पुतण्याला तुम्हाला डाऊनिंग स्ट्रीटवर आणायला सांगा,’ असे ऋषी सुनक म्हणत आहेत.

बॉलिवूड अभिनेता विजय वर्माने ऋषी सुनक यांच्या ‘विजय मामा’च्या व्हिडिओला उत्तर दिले आहे. स्वतःला विजय मामा समजत विजयने मजेशीरपणे उत्तर दिले.  ‘नमस्कार बेटा जी, नवीन इनिंग सुरू केल्याबद्दल अभिनंदन, लवकरच 10 डाउनिंग स्ट्रीटवर भेटू,’ असे विजय वर्माने म्हटलं आहे.

दरम्यान, ऋषी सुनक यांच्या व्हिडिओवर अभिनेता विजयची ही मजेदार प्रतिक्रिया एलॉन मस्क यांच्या नुकत्याच केलेल्या ट्विटशी जोडली जात आहे. एलॉन मस्कने ‘ट्विटरवर कॉमेडी कायदेशीर आहे,’ असे ट्विट केले होते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *