Headlines

रवी राणा-बच्चू कडू वादावर विरोधकांची काय भूमिका, अंबादास दानवे म्हणाले “फक्त बोलून…” | ambadas danve demands inquiry of ravi rana statements made against bacchu kadu

[ad_1]

अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद वाढला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात आले आहे. दरम्यान रवी राणा यांनी केलेल्या आरोपांचा आधार घेत आता विरोधकांनी सत्ताधारी आणि बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करायला हवी, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली आहे.

हेही वाचा >>>> “उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था”, बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले “मी त्यांना दोष देणार नाही, पण…”

कुठेतरी पाणी मुरत आहे. म्हणूनच रवी राणा यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आरोप केला आहे. त्यांनी केलेला आरोप कदाचित चुकीचाही असेल. त्यामुळे या आरोपाची चौकशी करायला हवी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवणीत राणा यांनी याआधी जी विधानं केलेली आहेत, त्याची सरकारकडून चौकशी केली जात आहे. रवी राणा यांनीच मी केलेल्या आरोपाची चौकशी करायला हवी, अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांकडे मांडायला हवी. याआधी ते लोकसभा अध्यक्षांकडे गेले होते. फक्त बोलून काहीही होणार नाही, असे दानवे म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>>> ‘मला गुवाहाटीहून परत यायचं होतं’, बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “मी तिथं जाऊन…”

बच्चू कडू, रवी राणांमधील वादाला कशी सुरूवात झाली?

गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचणारे एक वक्तव्य केले होते. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. मेळघाटातील धारणी येथेही त्यांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचले होते. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.

हेही वाचा >>>> ‘नंबर दोनचे पप्पू’ म्हणत सत्तारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले “दोन दिवसांत तुम्ही…”

मुख्यमंत्री दोघांमधील वाद मिटवणार?

रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. तर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहेत. याच कारणामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद हा शिंदे गट-भाजपासाठी अडचणीचा विषय ठरण्याची शक्यता आहे. परिणामी राणा आणि कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *