Headlines

प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!

[ad_1]

Rashmika Mandanna and Prabhas : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बाहुबली स्टार प्रभास लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हे दोघं ‘स्पिरिट’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शक संदीप वांगा करणार आहे. रश्मिका आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण ते दोघं पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्या दोघांनी स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. 

Siasat चया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाचा संदीप रेड्डी वांगासोबत हा दुसरा चित्रपट असणार आहे. तर स्पिरिट या चित्रपटाविषयी संदीप रेड्डी वांगाला विचारण्यात येताच त्यानं सांगितलं की याच वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. तर या वर्षाच्या शेवटी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. 

रश्मिकाविषयी बोलायचं झालं तर संदीप रेड्डी वांगासोबत तिनं ‘अॅनिमल’ या चित्रपटात काम केलं. या चित्रपटात तिनं रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर केली होती. अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. त्यांचा हा चित्रपट चांगलाच हिट झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. तर सध्या ती ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत अल्लू अर्जुन दिसणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

रश्मिकानं ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी सांगत म्हणाली, “तिनं ‘पुष्पा 2’ मधील गाण्याचं शूटिंग संपवलं आहे. त्याशिवाय तिनं सांगितलं की चित्रपटाची संपूर्ण टीम ही या चित्रपटाला ‘पुष्पा : द राइज’ पेक्षा जास्त हिट बनवण्यासाठी खूप मेहन घेते”

हेही वाचा : ‘तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं…’, मनीषा कोयरालासोबतच्या रोमॅन्टिक सीनवर देओलचा खुलासा

प्रभासविषयी बोलायचे झाले तर त्याचा ‘सलार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील पटकथा आणि प्रभासच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली. दोन खास मित्र जेव्हा एकमेकांचे शत्रू होतात तेव्हा काय होऊ शकतं, अशी यांची पटकथा आहे. तर प्रभास लवकरच ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय ‘राजासाब’ आणि ‘सलार 2’ हे दोन चित्रपट देखील त्याच्याकडे आहेत. . [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *