Headlines

Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा

[ad_1]

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together :  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि संपूर्ण भारतीय तरुणांवर राज्य करणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही टॉपच्या कलाकारांपैकी एक आहे. रश्मिका मंदानानं काल 5 एप्रिल रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्तानं रश्मिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाइव्ह येत, शुभेच्छा दिल्यामुळे सगळ्यांचे आभार मानले आहे. रश्मिकानं तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत (Vijay Deverakonda) वाढदिवस साजरा केला असं म्हटलं जातं. दरम्यान, तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत ते दोघं एकाच ठिकाणी असल्याचं म्हटलं जातं. 

रश्मिका तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाइव्ह आली होती. त्यावेळी रश्मिका तिच्या चाहत्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आभार मानताना दिसते. ज्या ठिकाणी बसून रश्मिकानं लाइव्ह केलं त्याच ठिकाणी विजय देवरकोंडानं देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता हे पाहता नेटकरी यावर सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. रश्मिकानं तिचा वाढदिवस विजयसोबत त्याच घरात साजरा केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ही चर्चा सुरु होताच रश्मिकानं यावर रिअॅक्ट केलं आहे. ‘अय्यो जास्त विचार करू नको बाबू’ असं म्हटलं. (Rashmika Mandanna Viral Video) 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दोघांचे नाव एकत्र घेण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मालदीवच्या ट्रिपवरून नेटकऱ्यांनी ते दोघं एकत्र असल्याचे म्हटले होते. तर रश्मिका आणि विजय हे दोघेही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. त्या दोघांना ‘डियर कॉमरेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 

रश्मिकाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले. तर रश्मिकाचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर होता. त्यावेळी ती तिच्यापेक्षा वयानं 13 वर्षांनी मोठा अभिनेता रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा नातं तुटलं. दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजवर त्या दोघांनी यावर कधीही भाष्य केलं नाही. 

हेही वाचा : Salman Khan : वय हा केवळ आकडा… 57 वर्षीही पिळदार शरीर, शर्टलेस फोटोवर तरुणींच्या कमेंट्स

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together actress video viral

दरम्यान, रश्मिका मंदाना लवकरच ‘ॲनिमल’ (Animal) या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारणार आहे. याचबरोबर बहूप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ या चित्रपटात ती पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसेल. तर या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा पुष्पाच्या भूमिकेत दिसणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *