Headlines

Rashi 2022: ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह बदलणार राशी, या राशींना मिळतील अशी फळं

[ad_1]

October 2022 Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केल्यानंतर अनेक बदल घडत असतात. ग्रहांची स्थिती आणि गोचर कुंडलीतील स्थान यावरून शुभ अशुभ फळं ठरवली जातात. ग्रहांच्या राशी बदलाचा 12 राशींवर परिणाम होत असतो. ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून आहे. या गोचरामुळे पुढील महिन्यात सहा राशींना शुभ अशुम परिणाम जाणवतील. सर्वात आधी जाणून घेऊयात ऑक्टोबरमध्ये कोणते ग्रह आपली राशी बदलणार आहेत.

ऑक्टोबर 2022 मध्ये ग्रह गोचर

  • मंगळ 16 ऑक्टोबर 2022 रोजी मिथुन राशीत करणार प्रवेश
  • सूर्य 17 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत करणार प्रवेश
  • शुक्र 18 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत करणार प्रवेश
  • शनि 23 ऑक्टोबर रोजी मकर राशीतून मार्गस्थ होणार
  • बुध 26 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत करणार प्रवेश

मेष : या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना अतिशय शुभ असणार आहे. सरकारी नोकरी मिळण्याचे शुभ योग आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि कामात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून समाधान मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार करण्यात यश मिळेल. या काळात जुनाट आजारापासून मुक्त होण्यास मदत करेल.

मिथुन : वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत वर्तन चांगलं ठेवा आणि कडू बोलणे टाळा. या काळात प्रवास फलदायी होणार नाही, त्यामुळे टाळा. स्वतःला सर्जनशील कार्यात गुंतवून ठेवा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्वचेशी संबंधित आजार त्रास देऊ शकतात.

सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे सूर्य जर दुसऱ्या स्थानातून मार्गस्थ होत असेल तर तो शुभ मानता येत नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कठीण असू शकतो. त्यामुळे हा वेळ संयमाने घालवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला नम्र ठेवा. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा. व्यवहारात सावध राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.

तूळ: ऑक्टोबर महिन्यात संमिश्र बातम्या मिळतील. जे लोक दीर्घ काळापासून परदेश प्रवासाची वाट पाहत आहेत त्यांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. ऑक्टोबरमध्ये तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन गुंतवणूक देखील करू शकता. वाहन चालवताना काळजी घ्या. 

वृश्चिक: ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. तुम्हाला कंपनीकडून चांगला बोनस मिळेल आणि प्रमोशनचीही शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि अनेक नवीन वस्तू खरेदी करून घरी आणाल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्ही अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवू शकाल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या शैलीचे सहकारी कौतुक करतील. 

कुंभ: तुमचे वाढलेले खर्च चिंतेचे कारण बनतील. घरात जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. आरोग्य बिघडल्याने समस्या वाढू शकतात. मानसिक तणाव वाढेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला राहील. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा लागेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *