Headlines

रणदीप हुड्डाच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत चर्चा तमन्ना भाटियाची! अभिनेत्रीच्या लूकनं वळवल्या सगळ्यांच्या नजरा

[ad_1]

Tamannaah Bhatia : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा 29 नोव्हेंबर रोजी गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत लग्न बंधनात अडकला. त्यांनी मणिपुरच्या इंफालमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या लग्नात कुटुंबातील लोक सहभागी झाले होते. आता या कपलनं त्यांच्या मित्रांसाठी आणि बॉलिवूडमधील लोकांसाठी मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन केले होते. काल 11 डिसेंबर रोजी त्यांनी त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवली होती. त्यात संपूर्ण बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रणदीप हुड्डानं त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे तमन्ना भाटीयानं वेधलं आहे. 

रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीतील व्हिडीओ अनेक सेलिब्रिटी फोटोग्राफर्सनं शेअर केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओची देखील चर्चा सुरु आहेत. या व्हिडीओत रणदीप हुड्डाचा ऑल ब्लॅक लूक पाहायला मिळत आहे, तर लिननं लाल रंगाची सीक्वेंस वर्क असलेली साडी नेसली आहे. लिनची साडी ही फक्त लाल रंगाची नसून त्यात मरुन रंगाची देखील शेड आहे. त्याशिवाय लिननं तिच्या डोक्यावर पधर देखील घेतला आहे. ज्यामुळे तिचा लूक हा खुलून दिसत आहे. 

त्यांच्या रिसेप्शन पार्टीत तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे देखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तमन्नानं काळ्या रंगाची प्रिंटेड, गोल्डन सीक्वेंसची साडी नेसली आहे. तर विजय वर्मानं ऑल ब्लॅक सूट परिधान केला आहे. त्या दोघांची ट्युनिंग आणि जोडी फार सुंदर दिसत आहे. त्यांनी एकत्र मिळून पापाराझींना पोझ देखील दिले आहेत. 

याशिवाय या रिसेप्शन पार्टीत अभिनेता शरद केळकर त्याची पत्नी कृति केळकरसोबत पोहोचला होता. त्यांचा पार्टीतील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यांच्याशिवाय या चित्रपटात मानवी गागरू,  इमतियाज अली, सयानी गुप्ता, रसिका दुग्गल, गजराज राव,  शिबानी बेदी आणि टिस्का चोप्रासारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

हेही वाचा : शाहरुख खान पुन्हा एकदा वैष्णोदेवीच्या चरणी; एका वर्षात तिसऱ्यांदा घेतलं दर्शन

रणदीप आणि लिनविषयी बोलायचे झाले तर ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा विवाह सोहळा हा इंफालच्या चुमथांग शन्नापुंग रिसॉर्टमध्ये झाला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, लग्न करण्याआधी त्या दोघांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले होते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *