Headlines

मंदिरात काय मागेमागे…; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

[ad_1]

Ram Charan Tirupati Temple : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा आज 27 मार्च रोजी 39 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं राम चरणनं त्याची पत्नी उपासना कामिनेनी आणि लेक क्लिन कारा कोनिडेलासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी राम चिडल्याचे पाहायला मिळते. खरंतर सुरुवातीला रामनं कॅमेऱ्याकडे लक्ष दिले नाही, पण नंतर तो थेट चिडल्याचे दिसते. 

राम, उपासना आणि क्लिनचा हा व्हिडीओ एएनआय या न्यूज एजन्सीनं शेअर केला आहे. यावेळी राम आणि उपासना हे पारंपारिक वेषात दिसले. रामनं पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि वेस्टी परिधान केली होती. तर त्याची पत्नी उपासना ही गुलाबी साडीत दिसली. तर उपासनानं त्यांची लेक क्लिन काराला कडेवर घेतलं असून मंदिरच्या दिशेनं जात असताना तिला सगळ्या कॅमेऱ्यांपासून लपवताना दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत मंदिर प्रशासनाचे काही लोक आणि जवळचे लोक दिसले. रामला मंदिराच्या दिशनं जाताना पाहून त्याचे चाहते उत्सुक झाले. 

या दरम्यान, ज्या गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले ते उपासना जसं मीडियापासून तिच्या लेकीला वाचवले त्यानं. इतकंच नाही तक त्यांच्या लेकीची थोडीशी सुद्धा झलक मीडियाला मिळू दिली नाही. त्यांनी मीडियाला स्पष्ट सांगितलं आहे की त्यांना त्यांच्या मुलीला लाइम लाईटपासून लांब ठेवायचं आहे. त्यांनी अजूनही क्लिन काराचा चेहरा रिव्हिल केलेला नाही. त्यांना त्यांच्या लेकीला एक प्रायव्हेट लाइफ द्यायची आहे. 

हेही वाचा : ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

राम चरण हा धार्मिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. तो या आधी अनेकदा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेला आहे. त्याशिलाय राम चरण हा दरवर्षी अयप्पा दीक्षा घेतो. दाक्षिणात्य परंपरेनुसार, जे लोत अयप्पा दीक्षा घेतात त्यांना 41 वर्षे अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्याशिवाय अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. ते एक वेळ जेवतात आणि काळे कपडे परिधान करतात. त्याच्याशिवाय तितके दिवस ते चप्पल देखील घालू शकत नाही. त्याशिवाय ते जमिनीवर झोपतात. राम अनेकदा धार्मिक गोष्टींचे पालन करताना दिसतो. त्याशिवाय तो त्याच्या कुटुंबासोबत अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दिसला होता. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *