Headlines

राघव-परिणीतीच्या लग्नासाठी पाण्यावर तरंगणारा महाल सजला! Video मध्ये पाहा वेडिंग वेन्यूची झलक

[ad_1]

Parineeti Chopra and Raghav Chaddha: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची. त्या दोघांच्या लग्नाच्या लोकेशनवर व्हाराडी मंडळी आली असून पाहुण्यांनी तिथले फोटो शेअर करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न जिथे होणार आहे त्या उदयपुराच्या हॉटेल लिला पेलेसमधून ही थेट दृश्य पाहायला मिळत आहेत. त्यातून परिणीती आणि राघवच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी आहे. यावर्षी 13 मे रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. तत्पुर्वी त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. ते एकमेकांना डेट करत असल्याची जोरात चर्चा सुरू होती.

त्यानंतर त्यांचा साखरपुडा इतक्या लवकर होईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. परंतु त्यांनी त्यांना नात्याबद्दल काहीच अधिकृत माहिती दिली नव्हती. ते अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट होत होते. त्यानंतर गुपचूप साखरपुडा उरकून त्यांनी चाहत्यांना धक्काच दिला होता. 

राघवचे काका पवन चड्ढा यांनी इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात उदयपुरच्या हॉटेल लीला पॅलेसची पहिली झलक दिसते आहे. यावेळी परिणीती चोप्राचे आईवडील दिसले सोबतच तिचा भाऊही दिसला. 

काल परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघं उदयपुरसाठी रवाना झाले होते. त्यांचे एअरपोर्टवरचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघं विमानात बसतानाचेही फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी दोघंही फार उत्साही होते. त्यासोबत त्यांच्या परिवारातील मंडळीही काल एअरपोर्टवर स्पॉट झाली. सध्या नाही म्हटलं तरी हवामान हे फारच थंड आणि गरम आहे. त्यात मध्येच पाऊस आणि मध्येच ऊनही येतं आहे.

सध्या परिणीती आणि राघवच्या घरचे हे उदयपूरमध्ये हॉटेल लीला पॅलेसची राईड करताना दिसत आहेत. पवन सचदेवा यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

अशावेळी हवामानाला अनुसरून फॅशनही परिणीतीनं आणि राघवनं केली होती. प्नवास करायचा होता म्हणूनही त्यानुसार फॅशन करण्यात आली होती. परिणीतीनं यावेळी लाल रंगाचा लॉन्ग वनपीस घातला होता तर त्यावर क्रीम ब्राऊन कलरची शॉल परिधान केली होती. 

हेही वाचा : फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य असं की, आजच्या अभिनेत्रीही जळतात!

सध्या परिणाती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या लोकेशनचे इनसाईड फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावेळी राघवचे काका आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या लोकेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

यात पाहू शकतो की, दोघांची फॅमिली ही उदयपुरमध्ये फार एन्जॉय करताना दिसते आहे. पहिल्या व्हिडीओत राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची फॅमिली हॉटेलची टूर घेताना दिसत आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की परिणीतीचे आणि राघवचे नातेवाईक हे फिरत आहेत आणि सोबतच हॉटेलचा बाहेरचा एरिया हा दिसतो आहे. ज्यात स्विमिंग पूल आणि मस्तपैंकी रॉयल अॅबियन्स दिसतो आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *