Headlines

प्रियांकोसमोरच ‘ती’ म्हणाली ‘मला वाटलं होतं निकशी माझं लग्न होईल, पण तू…’; पाहा काय होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

[ad_1]

Nick Jonas -Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं. लग्नानंतर प्रियांका ही नेहमीच पती निक जोनसच्या कॉन्सर्टला हजेरी लावताना दिसते. नुकताच जोनस ब्रदर्सचा एक कॉन्सर्ट होता. त्या कॉन्सर्टमध्ये प्रियांका तिचा छोटा दीर फ्रेंकी जोनससोबत स्टेडियममध्ये पोहोचली होती. यावेळी प्रियांकाला पाहून अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यातलाच एक व्हिडीओ म्हणजे एका चाहतीनं प्रियांकाला सांगितलं की तिला अभिनेत्रीची इर्शा वाटते आणि त्याचे कारण हे तिनं निक जोनसशी लग्न केलं हे आहे. 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चाहती प्रियांकाला बोलते की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी खरंच विचार केला होता की मी निक जोनसशी लग्न करेन, पण मला आनंद आहे की तू त्याच्याशी लग्न केलस. यावर उत्तर देत प्रियांका सुरुवातीला हसते आणि उत्तर देत म्हणते की मला पण या गोष्टीचा आनंद आहे की मी असं केलं. त्यात पुढे ती महिला बोलते की मला तुझी खूप इर्शा वाटते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

या व्हायरल व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की माझ्या आवडत्या सेलिब्रिटी जोडींमध्ये ही एक आहे. त्या दोघांनी नेहमी आनंदी रहावं हिच इच्छा आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, पण नशिबात आमची प्रियांका होती. याशिवाय प्रियांकानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. प्रियांका या फोटोंमध्ये चांगलीच बोल्ड दिसत आहे. 

हेही वाचा : VIDEO : अजित पवारांना पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

प्रियांका आणि निक जोनस विषयी बोलायचे झाले तर, प्रियांका आणि निक यांनी 2018 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केलं. जोधपुरच्या उम्मेद भवनमध्ये प्रियांका आणि निकनं दोन वेगवेगळ्या परंपरेनं लग्न केलं. सगळ्यात आधी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार त्यांनी सप्तपदी घेतल्या. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ते दोघे पालक आहे. सरोगसीच्या मदतीनं त्यांनी मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निक दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे आणि त्यांच्या लेकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *