Headlines

Priyanka Chopra – करण जोहरचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !

[ad_1]

Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही काही दिवसांपूर्वी तिच्या बॉलिवूडमधील राजकारण असल्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत होती. प्रियांकाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं (Kangana Ranaut) या सगळ्यासाठी लोकप्रिय निर्माता करण जोहरला (Karan Johar) कारणीभूत ठरवले होते. तिनं म्हटलं की प्रियांकाला करणनं बॅन केलं होतं. आता करण आणि प्रियांकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांना या व्हिडीओत पाहिल्यानंतर त्या दोघांमध्ये मतभेद नसल्याचं दिसून येत आहे. 

काल म्हणजेच शुक्रवारी 31 मार्च रोजी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज पासून अभिनय क्षेत्रातील अनेकांनी (NMACC) च्या लॉन्चमध्ये हजेरी लावली होती. हे मुंबईच्या बीकेसी परिसरात असलेल्या जियो वर्ल्ड गार्डनमध्ये नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (NMACC) चं लॉन्च होतं. यावेळी प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनससोबत दिसली होती. त्यावेळी प्रियांका आणि करण आमनेसामने आले होते. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हसत एकमेकांशी बोलत होते. 

प्रियांका आणि करणचा व्हिडीओ – 

दरम्यान, प्रियांकानं काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर कंगना रणौतनं तिला पाठिंबा दिला होता. तर तिनं करण जौहरवर निशाना साधला होता. त्या दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोल्ड वॉर सुरु आहे. दरम्यान, नुकतंच समोर आलेल्या त्यांच्या या व्हिडीओयनं असं वाटतंय की कंगनानं केलेलं वक्तव्य तिच्यावर उलटलयं. प्रियांका आणि करणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हेही वाचा : Dasara ची ‘भोला’ला जोरदार मात टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत

आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कंगनाचं वक्तव्य पाहता, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींचे म्हणणे आहे की कंगनानं तिच्यात आणि करणमध्ये असलेला वाद पाहता प्रियांकाच्या प्रकरणात त्याला मुद्दामून म्हटलं आहे. तर अनेकांनी प्रियांका आणि करणच्या व्हिडीओपाहता त्या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी प्रियांकाला ट्रोल करत म्हणाला की आता हिच्यासोबत होणारं राजकारण कुठे आहे. तर एक नेटकरी तिला म्हणाला की तिला करणला भेटण्यात काही इच्छा नाही. ती फेक अॅक्टिंग करण्यात कौशल आहे, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओवर केल्या आहेत.   

दरम्यान, करण जोहरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर लवकरच ती सिटाडेल या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या ती या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर करण जोहरविषयी बोलायचे झाले तर त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहेत.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *