Headlines

‘अभिनय, राजकारणापाठोपाठ आता मला…’, प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली इच्छा

[ad_1]

Priya Berde Expressed Her Wish : नव्वदच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बेर्डे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवला. नाटक, मालिका, चित्रपट यापाठोपाठ त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्दही सुरु केली आहे. सध्या त्या भाजपच्या राज्य सांस्कृतिक प्रकोष्टच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे या सध्या सिनेसृष्टीतील कलावंतांसाठी काम करताना दिसत आहेत. आता प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या काही इच्छा सांगितल्या आहेत. 

प्रिया बेर्डे यांनी नुकतंच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक पत्रकारांना मुलाखत दिली. यावेळी ‘सकाळ’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांना आता आयुष्यात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, अशा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांच्या काही इच्छा व्यक्त केल्या. त्यावेळी त्यांनी मुलांसोबत फिरायला जाण्यापासून स्कूबा डाईव्ह करण्यापर्यंत अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले. 

“मला पॅराग्लायडिंग करायची इच्छा”

“मला पॅराग्लायडिंग वैगरे करुन पाहण्याची फार इच्छा आहे. मला काही अॅडव्हेंचर्सदेखील करायचे आहेत. मी खूप साहसी आहे. मला या गोष्टी करायला आवडतात. मला पाण्याची भीती वाटते. मी समुद्राच्या खाली वैगरे जाण्याची हिंमत करु शकत नाही. पण मला आता ते करुन पाहायचे आहे. त्यासोबतच मला सर्व तीर्थक्षेत्र फिरायची आहेत. मी स्वामीभक्त असल्याने मला कर्दळीवनात जायचे आहे. माझी पिठापूर, कारंजा हे काही तीर्थक्षेत्र फिरायचे राहिले आहेत”, असे प्रिया बेर्डे म्हणाल्या. 

“त्यासोबतच त्यांनी अभिनयाच्या बाबतीत माझं सर्व करुन झालं आहे. माझं काही राहिलंय असं मला तरी वाटत नाही. जर काही राहिलं असेल तर त्याबद्दल मला अजिबात खंत वाटत नाही. त्याउलट आता माझ्या वाट्याला जे आहे, त्यात मला परमेश्वराने यश द्यावे एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यासोबतच मला माझ्या मुलांसोबत एक ट्रीप करायची आहे. आम्ही काही वर्षांपूर्वी सिंगापूर, बँकॉक, थायलँड हे फिरलो होतो. पण आता मला त्यांच्यासोबत जग फिरायचे आहे. माझी ती इच्छा लवकरच पूर्ण होईल”, असेही म्हटले आहे. 

प्राजक्ता माळीसोबत लवकरच झळकणार चित्रपटात

दरम्यान प्रिया बेर्डे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमधून अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. आता लवकरच त्या “भिशी मित्र मंडळ” या चित्रपटात झळकणार आहेत. यात प्राजक्ता माळीही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *