Headlines

‘प्रेम विचार करुन केलं जात नाही…’ सैफ अली खानचा मुलला डेट करण्यावर पलक तिवारीने सोडलं मौन

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली या सिनेमात श्वेता तिवारी झळकरणार आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याने पलक तिवारी प्रसिद्धीच्या झोतात आली.  

पलक तिवारीच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. आता अखेर ती सलमानच्या चित्रपटातून पदार्पण करत आहे. याआधी आम्ही तुम्हाला सांगतो की, सिनेमात पदार्पण करण्याआधीच पलक तिवारी चर्चेत आली आहे. कारण पलक तिवारी सैफ अली खानच्या मुलाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा होती. अनेकदा हे दोघंही एकत्र स्पॉट झाले आहेत. एकदा तर पलक आणि इब्राहिम एकत्र कारमध्ये स्पॉट झाले होते. यावेळी कॅमेराची लाईट चेहऱ्यावर पडताच तिने चेहरा लपवला होता. यानंतर या दोघांच्या अफेअर्सच्या बातम्यांनी जोर धरला होता. 

नुकतंच अभिनेत्रीच्या लेकीने तिच्या रिलेशनशिपवर मोठा खुलासा केला आहे. सलमान खानसोबत काम करण्या व्यतिरिक्त तिने इब्राहिम अली खानसोबत सुरु असलेल्या लिंप-अपच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पलकने आता Ibrahim Ali Khan सोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. या मुलाखती दरम्यान पलकला विचारण्यात आलं की, ती इब्राहिमला डेट करतेय का? 

पलक तिवारीने नुकतीच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या सुरु असणाऱ्या लिंकअपच्या बातम्यांवर खुलासा केला आहे. खरंतर अभिनेत्रीला मुलाखती दरम्यान तिच्या आणि इब्राहिमच्या डेटींगवर प्रश्न विचारण्यात आला. यावंर ती म्हणाली की, दोन सिनेमाच्या शूटिंगने मला खूप व्यस्त ठेवलं आहे. आणि यासाठी मी खूप खुश आहे. आणि हेच माझं ध्येय आणि फोकस आहे. हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी या अफवांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. कारण हा एक माझ्या आयुष्याचा भाग आहे. मी या सगळ्यापेक्षा माझ्या कामावर लक्ष केंद्रित करु ईच्छिते.

एवढंच नव्हे तर अभिनेत्री पुढे म्हणाली, ”प्रेम कधीच कॅलक्यूलेट केलं नाही जाऊ शकतं तसंच ‘प्रेम विचार करुन केलं जात नाही… आणि ना ही त्याची भविष्यवाणी केली जाऊ शकते की, कधी कुठे आणि कोणावर प्रेम होईल. ईथे स्टेजवर माझ्यासाठी सगळ्यात आधी माझं काम आहे.  प्रोफेशनली ही वेळ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि माझी एनर्जी माझ्या कामावर घालवू ईच्छिते.” असं पलक या मुलाखतीवेळी म्हणाली.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *