Headlines

प्रथमेश परबपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याने उरकला साखरपुडा, फोटो केला शेअर

[ad_1]

Sameer Vidwans Juilee Sonalkar Engagement : दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री क्षितीजा घोसाळकरसोबत साखरपुडा उरकला. याचे फोटो आणि व्हिडीओहीही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याबरोबरच आता एका मराठी दिग्दर्शकानेही साखरपुडा केला आहे. त्याने फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक समीर विध्वसंने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. समीरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने साखरपुडा केल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. समीरने व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर जुईली सोनाळकर सोबत साखरपुडा केला आहे. मोजक्याच मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्याचा साखरपुडा पार पडला. 

हेही वाचा : लाईव्ह व्हिडीओदरम्यान साक्षी गांधी गौरी कुलकर्णीला म्हणाली बावळट, नेमकं काय घडलं?

अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

समीर विध्वंसने दिलेल्या गुडन्यूजनंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेने अभिनंदन असे म्हणत कमेंट केली आहे. तर अमृता खानविलकरने फारच मस्त, अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री पूजा सावंत, सुरुची अडारकर, सुयश टिळक, सायली संजीव, प्रिया बापट, आयुषी टिळक, स्वप्नील जोशी यांसारख्या कलाकारांनीही त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : ‘झी मराठी’वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो

समीर विध्वंसची कारकिर्द

दरम्यान समीर विध्वंसने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘आनंदी गोपाळ’, ‘लोकमान्य’, ‘डबल सीट’, ‘धुरळा’, ‘टाईम प्लीज’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘क्लासमेट्स’, ‘वायझेड’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘सायकल’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. त्याने ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याने लोकमान्य या चित्रपटामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांची भूमिका साकारली होती. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *