Headlines

‘डोक्यावर शिवरायांचा हात, रक्तात आंबडेकर आणि मनगटात…’, क्रांती रेडकरची समीर वानखेडेंसाठी पोस्ट

[ad_1]

Kranti Redkar Post For Sameer Wankhede : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. कॉर्डिलिया क्रुझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. आता याप्रकरणी ईडीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याबद्दलचा तपासही सुरु केला आहे. आता याबद्दल त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे. 

क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच क्रांती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने समीर वानखेडेंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत क्रांतीने समीर यांना तू लढ, विजय तुझाच आहे, असे म्हटले आहे. 

क्रांती रेडकरची प्रतिक्रिया

“ज्याच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात, ज्याच्या मनगटात माय भवानीच्या तलवारीचं बळ, ज्याच्या रक्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्याला भीती कसली आणि कोणाची? त्रास त्यालाच होतो जो सत्याच्या बाजूने लढत असतो. पण जेव्हा पावनखिंड वाचून आपण मोठे झालेलो असतो, तेव्हा ही लढाई फारच लहान आणि शुल्लक वाटत असते. एक अर्धांगिनी म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. तू लढ, तू लढ… विजय तुझाच आहे”, अशी पोस्ट क्रांती रेडकरने केली आहे. 

त्याबरोबरच क्रांतीने समीर वानखेडेंशी संबंधित एक बातमी पोस्ट केली आहे. त्यावर तिने “भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे”, असे म्हटले आहे. तिने या दोन्ही पोस्ट शेअर करत समीर वानखेडेंना टॅग केले आहे. 

दरम्यान कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्यावर मागच्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याआधारे ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाईल, अशी माहिती मिळत आहे. आता हा गुन्हा रद्द करण्याच्या आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *