Headlines

लोकप्रिय अभिनेत्रीला अटक, मैत्रिणीच्याच घरातून एक किलो सोनं चोरल्याचा आरोप

[ad_1]

Soumya Shetty Arrested: लोकप्रिय साउथ इंडियन अभिनेत्री आणि कंटेट क्रिएटर सौम्या शेट्टी (Soumya Shetty) हिला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीवर सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्री सौम्या शेट्टी हिने सेवानिवृत्त भारतीय पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे अभिनेत्रीने तिच्या मैत्रिणीच्या घरीच चोरी केली आहे. पोलिसांनी सौम्यावर कारवाई करत तक्रार दाखल केली आहे तसंच तिला अटकही केली आहे. 

भारतीय पोस्ट विभागातील निवृत्त कर्मचारी प्रसाद बाबू यांच्या घरातील 150 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्या नेहमीच प्रसाद यांच्या घरी येत-जात असतं. प्रसाद यांची मुलगी मोनिका हिच्यासोबत तिची चांगली मैत्री होती. त्यामुळंच लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तुंचा तिला आवड होती. सौम्यावर प्रसाद यांच्या घरच्यांचा खूप विश्वास होता. त्याचाच गैरफायदा सौम्याने घेतला. 

सौम्या कित्येकदा त्यांच्या बेडरुममध्ये सोन्याचे दागिने चोरण्याच्या बहाण्याने गेली होती. बाथरुममध्ये जाण्याचा बहाणा करुन ती सतत बेडरुममध्ये जायची. एकदिवशी मोनिकाचे कुटुंबीय एका लग्नात गेले होते. लग्नातून परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की घरात ठेवलेले सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. 

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. घटनास्थळावरील फिंगरप्रिंट्स आणि सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले. तेव्हा पोलिसांनी 11 जणांवर संशय व्यक्त केला. त्यानंतर त्या प्रत्येकांची चौकशी करण्यात आली. यातील तीन जणांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले. यात सौम्यादेखील सहभागी होती. 

पोलिसांनी कारवाई करत सौम्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरी केल्यानंतर सौम्या मोठ्या शिताफीने गोव्याला पळून गेली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळं तिला पकडण्यास यश आले आहे. सोम्याला अटक केल्यानंतर तिने चोरी केल्याचे कबुल केले आहे. आत्तापर्यंत 74 ग्रॅम सोने पोलिसांनी तिच्याकडून जप्त केलं आहे. उर्वरित सोनं तिच्याकडे नसल्याचे ती ते परत करु शकत नाही, असं तिने म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सौम्या शेट्टी हिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. तिच्या या कारनाम्यामुळं त्यांनाही एकच धक्का बसला आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *