Headlines

PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी

[ad_1]

South Star Yash : दाक्षिणात्य अभिनेता यशनं त्याच्या अभिनयानं लाखो लोकांची मने जिंकली आहे. यश हा फक्त त्याच्या चांगल्या अभिनयासाठी ओळखला जात नाही तर त्यासोबत त्याच्या शांत स्वभावासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या शांत स्वभावासाठी त्याची जास्त ओळख आहे. त्याच्यातील हे गुण त्याला सगळ्यापासून वेगळे बनवतात. त्यातून एक गोष्ट समजते की तो खूप साधारण आयुष्य जगतो. त्याला तेच आवडते. 

सोशल मीडियावर सध्या त्याचा एक फोटो देखील व्हायरल होतोय. त्यात तो किराण्याच्या दुकानातून काही सामान खरेदी करत असल्याचे पाहायला मिळते. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लोकांना त्याच्यात असलेला हा साधेपणा प्रेक्षकांना फार आवडतो. त्याचीच नेहमी लोक स्तुती करत असतात. यश काही त्याच्या घराच्या आवारात असलेल्या दुकानात जाऊन हा सामान घेत होता असं नाही. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घराच्या आवारत असलेल्या दुकानात सामान घेण्यासाठी जात असल्याचे पाहायला मिळते. पण यथ तसा नाही. यश एक लक्झरीएस लाइफस्टाइल जगतो. त्याचाच हा एक फोटो आहे. 

कुठला आहे मग हा फोटो? 

यश त्याच्या कुटुंबासोबत शिराळीच्या भटकलमध्ये त्रिपुरा मठ मंदिरात गेला होता. इथे यशच्या चाहत्यानं त्याला तिथे पाहिले आणि त्याचे फोटो काढले. यावेळी यश हा त्याच्या पत्नी राधिकासोबत दिसला. त्याची पत्नी राधिकासाठी आइस कॅन्डी विकत घेतना दिसला. यशला त्याच्या पत्नीसाठी या छोट्या दुकानातून पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि चॉकलेट घेताना पाहून त्याचे चाहते त्याची स्तुती करत आहेत. 

काय म्हणाले नेटकरी? 

एक नेटकरी म्हणाला, ‘यात काही नवीन नाही. त्याला त्याच्या जुन्या दिवसांची आठवण येत असेल. जेव्हा त्याच्याकडे काहीच गमवायला असं नव्हतं. त्याचा अजूनही तसाच स्वभाव पाहून बरं वाटलं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दाक्षिणात्य कलाकारांची नाळ जमिनीशी जोडलेले आहेत.’ तिसरा म्हणाला, ‘किती साधारण माणूस आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हा खरा स्टार आहे.’ 

हेही वाचा : मेहंदीसाठी तयार होत असलेल्या सोनारिका भदौरियानं लावली आयव्ही ड्रिप!

‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ चॅप्टर 2’ ला ब्लॉकबस्टर सक्सेस मिळाल्यानंतर आता यश ‘टॉक्सिक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *