Headlines

Photo : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree

[ad_1]

Priyanka Chopra Wore 60yr Old Saree At NMACC : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनससोबत (Nick Jonas) काही दिवसांपूर्वी भारतात आली. तिचं भारतात येण्याचं कारण म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटनासाठी आणि त्याचसोबत तिची आगामी सीरिज सिटाडेलसाठी. काल त्याचा तिसरा दिवस होता. दरम्यान, सध्या प्रियांकाचे तिच्या दुसऱ्या दिवसाच्या आऊटफिटची चर्चा सुरु आहे. 

प्रियांकानं परिधान केलेला ड्रेस हा अमित अग्रवालनं डिझाइन केला होता. पण हा कोणताही ड्रेस नसून ती एक साडी आहे. प्रियांकानं ब्रोकेड बनारसी सिल्कची प्री-ड्रेप साडी नेसली आहे. त्यासोबत प्रियांकानं बस्टियर ब्लाऊजची निवड केली आहे. दरम्यान, आता डिझायनर याविषयी सगळ्या गोष्टी सांगत आहेत. 

प्रियांका NMACC च्या इंडिया इन फॅशन इव्हेंटमध्ये निक जोनाससह पिंक कार्पेटवर एन्ट्री केली होती. तिचा हा पिंक कार्पेट लूक डिझायनर अमित अग्रवालने तिच्यासाठी खास डिझाइन केला होता. आता अमितनं प्रियांकाच्या या डिझायनर लूकविषयी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. ही साडी कशी बनवण्यात आली याविषयी सांगत अमितनं काही फोटो शेअर केले आहेत. तर कॅप्शनमध्ये अमित म्हणाला, ‘प्रियांकानं नेसलेली ही साडी चांदीच्या धाग्यांचा वापर करून बनवलेली साठ वर्ष जूनी विंटेज बनारसी ब्रोकेड साडी आहे. त्यासोबत सुरेख पद्धतीनं नेसवलेल्या या साडीला होलोग्रामिक डिझाईनच्या ब्लाऊजची जोड देण्यात आली आहे. शिवाय इकत विणकामाचे ब्रोकेडमध्ये असणारे 9 रंग उठावदारपणे दिसतील याचीही इथं काळजी घेण्यात आली आहे.’

हेही वाचा : CID मालिकेमुळे मिळाली Sharad Kelkar ला आयुष्यभराची साथीदार

तो पुढे म्हणाला, ‘ही साडी आमची सिग्नेचर साडी आहे. तिला दागिन्यांनी सजवलेले आहे. वाराणसीच्या क्राफ्ट क्लस्टर्समध्ये हाताने विणलेल्या मूळ विंटेज कापडासह, सहा महिन्यांत ही साडी तयार करण्यात आली आहे.’

प्रियांका चोप्रानं देखील तिच्या या साडीतले काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. प्रियांकानं हे शूट वेगळ्या पद्धतीनं केलं आहे. प्रियांकानं एका रिक्षासमोर पोज देत हे फोटो शूट केले आहे. प्रियांका चोप्रानं केलेल्या या फोटोशूटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. दरम्यान, प्रियांकानं तिचा लूक आणखी सुंदर दिसावा म्हणून काही डायमंडचे दागिने परिधान केले आहेत. इतकंच काय तर प्रियांकानं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये रणवीर सिंगसोबत डान्सही केला. दरम्यान, लवकरच प्रियांका ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *