Headlines

Pankaj Udhas : एक गझल ऐकून अंतःकरणातून रडला होता भारतीय सिनेमाचा ‘शो मॅन’

[ad_1]

Pankaj Udhas Passed Away : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांना अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासलं होतं. पंकज यांची मुलगी नायब उधास हिने त्यांच्या निधनाची बातमी दिली. सुगम संगीत आणि गझल यांचा मिलाफ असलेलं पंकज उधास यांचं गाण आजही प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतं. मात्र, आता त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राला मोठा धक्का बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पंकज उधास यांच्या गाण्याचे अनेक फॅन होते. लहान पोरापासून ते पंतप्रधान देखील त्यांच्या गाण्याचं कौतूक करायचे. मात्र, तुम्हाला माहितीये का? खुद्द राज कपूर देखील पंकज उधास यांचं गाणं ऐकून ढसाढसा रडले होते.

नेमका किस्सा काय?

हा असा काळ होता, जेव्हा ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है…’ हे गाणं नुकतंच रेकॉर्ड झालं होतं. या चित्रपटाचे निर्माते राजेंद्र कुमार होते. एके दिवशी राजेंद्र कुमार यांनी राज कपूर यांना जेवण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी राजेंद्रजींनी राज कपूर यांना चिठ्ठी आई है गाणं ऐकवलं. ही गझल ऐकल्यानंतर राज कपूर यांच्या डोळ्यात आरोआप पाणी आलं. तेव्हा त्यांनी या गझलचं कौतूक देखील केलं. मी तुम्हाला सांगतो, हे गाणं हिट होणार, अशी भविष्यवाणी राज कपूर यांनी केली होती. त्यांची भविष्यवाणी खरी देखील ठरली.

बंदुकेच्या धाकेवर गायली गझल

एकदा झालं असं की, पंकज उधास यांनी उर्दु भाषेवर प्रेम जडलं. त्यांनी गझल गायकी सुरू केली. त्यावेळी ते स्टेजवर गायन करत असतं. एकदा गायन करताना त्यांनी 4 ते 5 गाणी गायली अन् कार्यक्रम संपवून निघाले. त्यावेळी एका रसिक प्रेक्षकाने त्यांना आणखी एक गाण्याची विनंती केली. परंतू त्याचा पेहराव बघून त्यांनी गायन करण्यास नकार दिला. त्याचा प्रेक्षकाला राग आता अन् त्याने थेट बंदूक काढून पंकज उधास यांच्यावर ताणली. त्यानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. पंकज उधास यांनी त्या व्यक्तीला शांत करत त्याची इच्छा पूर्ण केली होती.

दरम्यान, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी पंकज उधास यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं. 1987 मध्ये म्युझिक इंडियाने ‘शगुफ्ता’ नावाचा हा अल्बम लाँच केला ज्यामध्ये पंकज उधास यांना ऐकण्यासाठी लोक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर त्यांची ख्याती भारतात नाही तर परदेशात देखील पसरली होती.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *