Headlines

Opposition leader Ajit Pawar criticize shinde fadanvis goverment

[ad_1]

‘सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर काय आरोप करत आहेत. खोक्यांचा विषय बोलत आहेत. मंत्री कोण काय बोलतो. यांना काही तार्ताम्य राहील नाही. एक मंत्री अधिकाऱ्याला म्हणतो, तुम्ही दारू पिता का? काय चाललंय काय ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या मंत्र्यांना काय बोलावे आणि काय बोलू नये याबद्दल सूचना द्याव्यात’, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. पुणे दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा- “जाऊ द्या, जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”, अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

दिवाळीत १ किलो डाळ,१ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो तेल देणार होते. कुठे काहीही मिळाले नाही. तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते, असं एक मंत्री म्हणाले होते. या लोकांनी काय जनतेची थट्टा लावली आहे. मी आजपर्यंत इतकं असंवेदनशील सरकार पाहिलं नाही. ३१ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीबद्दल मदत देण्याचे आवाहन एका पत्राद्वारे केले होते. आता त्या पत्रावरील फक्त मुख्यमंत्री यांचे नाव बदला, असं माझं फडणवीस यांना आवाहन आहे. आता त्यांचेच सरकार आहे. आता त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी फडणवीसांना केलं आहे.

हेही वाचा- “….म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला”; जयंत पाटलांची सांगलीत टीका

वेदांताचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यावेळी त्यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणला जाणार असं सांगितले होते. मात्र आता एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. अशावेळी आधीच्या सरकारने काय केलं आणि या सरकारने काय केले. हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रकल्प कुणाच्या नाकर्तेपणामुळे जाताहेत का? एका राज्यात येऊ घातलेले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात यात काही राजकारण आहे का? सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही तरी काढले जात असून नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा. आता हे कुणाला तरी पटतंय का? आपल्यासमोर आज काय प्रश्न आहेत. लोकांना मदत करणे महत्वाचे आहे. यामुळे सर्व प्रश्न सुटणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *