Headlines

एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्रींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, सुकन्या मोने म्हणाल्या ‘आम्हाला…’

[ad_1]

Zee Chitra Gaurav Puraskar 2024 : मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यंदा या पुरस्कार सोहळ्यात एक उल्लेखनीय घटना घडली. यंदा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात प्रथमच सहा अभिनेत्रींना पुरस्कार देण्यात आला. आता याबद्दल अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. 

‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ या पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या पुरस्कार सोहळ्यात केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुकन्या मोने, दीपा परब, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि वंदना गुप्ते या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या. या सर्व अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला. 

सुकन्या मोने यांनी व्यक्त केल्या भावना

नुकतंच सुकन्या मोने यांनी या चित्रपटाबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुकन्या मोनेंसह दीपा परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि वंदना गुप्ते हे कलाकार दिसत आहे. या सर्वांच्या हातात  सगळ्यांच्या हातात ‘झी चित्र गौरव’ची ट्रॉफी पाहायला मिळत आहे. या फोटोला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. 

“सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार…. झी गौरव…. आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार… झी गौरव… ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला ‘ बाईपण भारी देवा! ‘ ला. असेच प्रेम, आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत…. कायम. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवल. आणि हा चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! श्री स्वामी समर्थ,  गणपती बाप्पा मोरया!”, असे सुकन्या मोनेंनी म्हटले. 

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटाला महिला वर्गानं अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील प्रत्येकाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल 76.5 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज जवळपास 8 महिने उलटले असले तरी आजही ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ कायम पाहायला मिळते.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *