Headlines

“नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं…” फडणवीसांच्या विधानाचा आदित्य ठाकरेंकडून समाचार, म्हणाले… | Aaditya thackeray on devendra fadnavis shembadi pora who protest for jobs rmm 97

[ad_1]

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिलं. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देणं अपेक्षित होतं. त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली असती तरी चाललं असतं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसंच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.

दुसरीकडे, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन करणाऱ्या तरुणांचा उल्लेख ‘शेंबडी पोरं’ आणि पत्रकारांचा उल्लेख ‘एचएमव्ही’ (His Masters Voice) असा केला. या विधानाचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. दोन्ही विधानांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आपला शब्द मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

हेही वाचा- “…मग तो प्रकल्प गुवाहाटीला घेऊन जायचं होतं” आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी!

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी आवाज उठवणाऱ्या आंदोलनकर्त्या तरुणांना शेंबडी पोरं किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या पत्रकारांना ‘एचएमव्ही’ म्हटलं आहे. पत्रकारांचा उल्लेख ‘एचएमव्ही’ असं करणं, हा पत्रकारांचा आणि पत्रकारिकतेचा अपमान आहे. तर स्वत:च्या न्याय-हक्कासाठी, महाराष्ट्राच्या आवाजासाठी, खोके सरकारमुळे महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं हे खूपच आयोग्य आणि निंदनीय आहे, हे वक्तव्य त्यांनी मागे घ्यावेत, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *