Headlines

‘मला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही…’, लग्नानंतर रकुलनं केलं जॅकीसोबतच्या नात्यावर वक्तव्य

[ad_1]

Rakul Preet singh on life after wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. बॉलिवूडमधील पॉवर कपल्सच्या यादीत त्यांचं देखील नाव आलं आहे. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या ते दोघं त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांचा आनंद घेत आहेत. या सगळ्यात रकुल प्रीतनं पती जॅकीसोबतच्या तिच्या नात्यावर स्पष्टपणे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

रकुल प्रीत सिंगला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, प्रश्न विचारण्यात आला की विवाहित असल्याचा टॅग मिळाल्यानंतर त्या दोघांमध्ये काही बदल झाला आहे का? त्याचं उत्तर देत रकुलनं म्हटलं की “ते दोघं आनंदी आहेत.” रकुलनं म्हटलं की “जेव्हा तीन वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा डेट करायला सुरुवात केली. तेव्हा आमच्यात या गोष्टीवरुन चर्चा झाली होती. मी आनंदी आहे, तू आनंदी आहेस. आमच्या दोघांपैकी कोणीही कोणतीही गोष्ट भरुन काढण्याचा प्रयत्न करत नाही.”

रकुलनं सांगितलं की “आम्ही एक व्यक्तीच्या रुपात संपूर्ण आहे. त्यात आम्ही एकत्र आल्यानं आनंदी असतो. मला त्याला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही की मी कंटाळली आहे. तू कशी आहेस. मला हे माहित आहे की मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे, त्याच्यासाठी पण हिच गोष्ट आहे. आम्ही दोघं जेव्हापण सोबत असतो, तेव्हा काम सोडतो.” 

जॅकी भगनानी आणि नात्यावर बोलताना रकुल पुढे म्हणाली, “अशी कोणतीच गोष्ट नाही जी आम्ही शेअर करत नाही.” रकुल प्रीत आणि जॅकीनं 21 फेब्रुवारी 2024 मध्ये गोव्यात लग्न केलं. ते दोघं ही त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. 

हेही वाचा : कोट्यावधीश बिझनेसमॅनशी जोडलं जातंय क्रिती सेननचं नाव, धोनीशी मिस्ट्री मॅनचं खास कनेक्शन

रकुल प्रीतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच कमल हासन यांच्या ‘इंडियन 2’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी, शंकर भी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे जॅकी त्याच्या आगामी प्रोडक्शन ‘बडे मियां छोटे मियां’ च्या प्रदर्शनाची प्रतिक्षा करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन सारखे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *