Headlines

नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच… ‘या’ दिवशी येतोय ‘वाळवी’चा ट्रेलर

[ad_1]

मुंबई : रेश मोकाशी म्हटलं की हटके विषय आलाच! त्यांच्या नव्या सिनेमाचे नाव चक्क ‘वाळवी’ असं आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का’ असे हटके विषय मराठी प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक परेश मोकाशी एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपुर्वी या सिनेमाचा टीझर झी स्टुडिओजने शेअर केला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती.

‘रोमान्स की बायोपिक? कॉमेडी की फॅमिली ड्रामा? ‘वाळवी’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी विषय असा मांडलाय की इथे जसं दिसतंय तसं नाहीये बरं का! ‘वाळवी’ १३ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात’, अशी कॅप्शन देत या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 4 जानेवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच झी स्टुडिओने त्यांच्या सोशल मीडियावरुन ही माहिती शेअर केली आहे. या सिनेमात अनिता दाते, शिवानी सुर्वे, स्वप्निल जोशी, सुबोध भावे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 झी स्टूडिओने एक व्हिडिओ शेअर करत, नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच… ‘वाळवी’ चा ट्रेलर येतोय ४ जानेवारीला आणि चित्रपट येतोय 13 जानेवारी पासून जवळच्या चित्रपटगृहात. असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान वाळवी हा सिनेमा १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून तेव्हाच नेमका काय प्रकार आहे हे लक्षात येईल. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘वाळवी’ सिनेमाच्या टीझरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमाच्या टीझरनं काहीतरी इंट्रेस्टिंग कथानक असणार हे जरी कळत असलं तरी सिनेमाच्या जॉनरचा मात्र थांगपत्ता लागताना दिसत नाही. सिनेमा रोमॅंटिक आहे,सस्पेन्स थ्रिलर आहे आहे की कॉमेडी काही कळेनासं झालंय. आणि म्हणून तर उत्सुकता शिगेला पोहोचलीय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *