Headlines

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

[ad_1]

Boney Kapoor Confirms No Entry 2 Starcast : बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ‘नो एण्ट्री’ चित्रपटाला ओळखले जाते. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. तर या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बोमन ईरानी हे कलाकार झळकले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाबद्दलची मोठी माहिती समोर आली आहे.

चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार 

गेल्या काही दिवसांपासून ‘नो एण्ट्री’ या चित्रपटाच्या दुसरा भाग येणार अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. यावर आता बोनी कपूर यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. तर याची निर्मिती बोनी कपूर करणार आहेत. बोनी कपूर हे लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार आहेत. 

आणखी वाचा : ‘असे आर्टिस्ट फारच कमी असतात…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल असं का म्हणाला प्रसाद खांडेकर?

या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरु होणार शूटींग

‘नो एण्ट्री’ या चित्रपटात सर्वच नवीन कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. यात वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे कलाकार झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे काम या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरु होणार आहे, असे बोललं जात आहे. बोनी कपूर यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली आहे. 

अभिनेत्रींचे कास्टिंग अद्याप बाकी

“आम्ही या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहोत. यात वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. यांच्यासोबत कोणत्या अभिनेत्री झळकणार याची कास्टिंग अद्याप झालेली नाही. सध्या आम्ही या चित्रपटासाठी कोणकोणत्या अभिनेत्री योग्य ठरतील याची चाचपणी करत आहोत. या चित्रपटात 10 अभिनेत्री असणार आहेत. विशेष म्हणजे यात वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे डबल रोलमध्ये दिसणार आहेत”, असे बोनी कपूर यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *