Headlines

‘नवरा माझा नवसाचा’ पाहताना मिताली मयेकरने केलं ‘असं’ काही, सिद्धार्थ चांदेकर म्हणाला ‘Mute करुन…’

[ad_1]

Navra Majha Navsacha : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट पाहिला नाही, असा माणूस क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. 2004 साली प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटाचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याची पत्नी मिताली मयेकर ही नवरा माझा नवसाचा हा चित्रपट पाहत असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट बघत असताना मिताली ही या चित्रपटातील अनेक डायलॉग कलाकारांसोबत बोलताना दिसत आहे. त्यासोबतच तिला हा चित्रपट पूर्ण पाठांतर असल्याचे दिसत आहे. यावेळी मिताली ही या चित्रपटातील गाणे, डायलॉग याची नक्कलही करत आहे. 

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

मितालीचा हा व्हिडीओ पाहून सिद्धार्थ चांदेकरने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “Mute करुन बघितला असता तरी सगळे डायलॉग्स कळले असते! नाही का मिताली मयेकर”, असे त्याने विचारले आहे. त्यासोबतच त्याने नवरा माझा नवसाचा असा हॅशटॅगही दिला आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर मितालीनेही अरे देवा, मी खरंच किती हुशार आहे, अशी कमेंट केली आहे. तर अनेक कलाकारही यावर कमेंट करताना दिसत आहे. 

दरम्यान ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे अनेक तगडे कलाकार होते. 

काही दिवसांपूर्वी नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. सचिन पिळगावकर यांनी याबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *