Headlines

राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव!

[ad_1]

70th National Film Awards 2022 : 70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022 जाहिर करताना त्यात काही बदल करण्यात आले आहेत. त्याविषयी काल म्हणजेच मंगळवारी सांगण्यात आले. नॅशनल अवॉर्डसाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नरगिस दत्त यांची नाव नसतील. ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कारा’ चं नाव बदलून ‘दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ करण्यात आलं आहे. तर नर्गिस यांचं नाव हे ‘राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी नर्गिस दत्त’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आलं असून त्याचं नाव ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म’ करण्यात आलं आहे. तर दिवंगत पंतप्रधान आणि दिग्गज अभिनेत्रीचं नाव नॅशनल फिल्म अवॉर्ड्सवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यासोबतच एकूण 12 बदल करण्यात आले आहेत. 

’70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022′ चे नियम बदलल्याची माहिती ही सरकारने नेमलेल्या समितीनं सांगितलं आहे. या बदलांनुसार, दादा साहेब फाळके पुरस्कारासोबत देण्यात येणारी रक्कम देखील वाढवली आहे. त्यासोबत आणखी काही पुरस्कार यात शामिल करण्यात आले आहेत. समितीच्या एका सदस्यनं ‘पीटीआई’ ला सांगितलं की ‘समितीनं कोरोना काळात या सगळ्या बदलांवर विचार केला होता. त्याचवेळी हे बदल ठरवण्यात आले होते.’

1. सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्काराचं अवॉर्डचं नाव बदलून दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट आहे.

2. पुरस्काराच्या रक्कम जी आधी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये वाटली जात होती आणि ती फक्त दिग्दर्शकाला मिळेल.

3.  त्याचप्रमाणे, राष्ट्रीय एकतेवर आधारीत असलेल्या फीचर फिल्मसाठई नर्गिस दत्त पुरस्कार होता त्याला आता राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म असं करण्यात आलं आहे. 

4. दादा साहेब फाळके पुरस्कारसाठी प्राइज मी जी प्रत्येकवर्षी जी 10 लाख होती ती आता बदलून 15 लाख रुपये करण्यात आली. 

5. याशिवाय, अनेक सेक्शन्समध्ये सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम 3 लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी 2 लाख रुपये करण्यात आली आहे. आधी ही रक्कम प्रत्येक सेक्शनप्रमाणे ही वेगवेगळी होती. 

हेही वाचा : ‘कभी खुशी कभी गम’ मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल

कोण होते पॅनलमध्ये?

इंडिया टुडेनं दिलेल्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर होत्या. तर, निर्माते प्रियदर्शन, विपुल शाह, सिनेमॅटोग्राफर एस. नल्लामुथू, सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथूल कुमार आदींचा समावेश होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *