Headlines

‘नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?’ जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

[ad_1]

Kareena Kapoor on Nanny: करीना कपूर लवकरच ओटीटीतून डेब्यू करणार आहेत. तिचा नेटफ्लिक्सचा ‘जाने जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावेळी करीना कपूर ही आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका प्रमोशनच्या मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या आयुष्यातील वैयक्तिक बाबींचा खुलासा केला आहे. तैमूर, जेह यांचा जन्म झाल्यापासून त्यांना सांभाळणाऱ्या नॅनीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्या किती पगार घेतात, तैमूर-जेहसोबत कुठेकुठे फिरतात, सोबतच त्यांच्यासाठी काय स्पेशल गोष्टी असतात याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आता सध्या याची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. ‘एक्सप्रेस अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत तिनं यावेळी याविषयी खुलासा केला आहे. 

सुजॉय घोश यांच्या ‘जाने जान’ या चित्रपटातून करीना ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खाननं त्याचा ओटीटी डेब्यू हा 2018 साली दिला होता. त्यावर्षी आलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मधून सैफ अली खान हा आगळ्यावेगळ्या भुमिकेतून झळकला होता. त्याच्या या भुमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर आता पाच वर्षांनी करीना कपूर ही ओटीटीवर पदार्पण करते आहे. यावेळी या चित्रपटातून विजय वर्मा आणि जयदीप अलहावतदेखील दिसणार आहेत. दोघंही ओटीटी स्टार्स आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. ‘पाताल लोक’ ही वेबसिरिजही प्रचंड गाजली होती. ज्यात जयदीप अलहावत दिसला होता. त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली होती. त्याचसोबत सध्या विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्या लव्ह अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा : Relationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, ‘या’ गोष्टी ट्राय करा

या मुलाखतीदरम्यान करीना कपूर म्हणाली की, ”आधी तैमूर आणि जेह यांची नॅनी ही वेगळ्या डेबलवर बसून जेवायची. त्यानंतर मात्र हे बदललं. आधी संपुर्ण परिवार जेवून घ्यायचा, सोबतच दोन्ही मुलंही जेवायची. त्यानंतर वेगळ्या डेबलवर बसून त्यांची नॅनी जेवायची. परंतु जेव्हा तैमूर आणि जेहनं हे पाहिलं तेव्हा त्यांना याबद्दल फार वेगळं वाटलं. त्यानंतर मात्र ही गोष्ट बदलली आणि त्यांची नॅनीही त्यांच्यासोबत जेवू लागली. तैमूर आणि जेह यांनी जेव्हा पाहिले की आपल्याला सांभाळणारी नॅनी आपल्यासोबत का जेवायला बसत नाही तेव्हा ते दोघंही प्रश्न विचारू लागले”, असं करीना म्हणाली. 

त्यापुढे ती म्हणाली की, ”त्यानंतर आमच्या घरात एक प्रथाच सुरू झाली जिथे आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसतो आणि आमच्यासोबत नॅनीही जेवते. खरंतर, त्या आमच्या घरातील फार महत्त्वाच्या सदस्य आहेत. त्या आमच्या मुलांचा सांभाळ करतात.”, असं ती यावेळी म्हणाली. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *