Headlines

Naga Chaitanya Relationship : आणखी किती लपवणार? शोभिता- नागा चैतन्य पुन्हा एकत्र, त्या क्षणांचा फोटो व्हायरल

[ad_1]

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Relationship : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री (Samantha ruth Prabhu) समंथा रुथ प्रभू यांच्या वैवाहिक नात्याला आता पूर्णविराम लागला आहे. या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या या नात्यात वेगळ्या वाटा निवडल्याचं चाहत्यांनीही पाहिलं. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य त्याच्या खासगी आयुष्यात पुढे जातो का, याबाबतच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. त्यातच एक नाव पुढे आलं, पाहता पाहता ही व्यक्ती नागा चैतन्यसोबत सातत्यानं दिसू लागली. हे नाव म्हणजे, अभिनेत्री (Sobhita Dhulipala ) शोभिता धुलीपालाचं. 

शोभिता आणि नागा चैतन्य या दोघांमध्ये नेमकं नातं काय, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. किंबहुना त्या दोघांनीही कधीच त्यांच्या नात्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण, सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झाला या फोटोनं नेटकऱ्यांना धक्काच दिला. बरं, यावरून चाहत्यांचं सेलिब्रिटी मंडळींवर किती काटेकोरपणे लक्ष असतं हेसुद्धा यातून स्पष्ट झालं. 

एका फोटोनं केली पोलखोल? 

नुकताच सोशल मीडियावर शेफ सुरेंद्र मोहन यांनी नागा चैतन्यसोबत एका रेस्टराँमध्ये काढलेला फोटो व्हायरल झाला. लंडनमध्ये हा फोटो घेण्यात आल्याचं म्हटलं गेलं. इथं कलाकाराचा भेटल्याचा आनंद शेफच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हे नेटकऱ्यांनीही पाहिलं. पण, त्यांनी याच फोटोत एक अशी व्यक्तीही पाहिली जी तिथं असणं अनपेक्षित होतं. ही व्यक्ती दुसरीतिसरी कुणी नसून खुद्द शोभिता धुलीपालाच होती. 

 

खरंतर शोभिताला या फोटोमध्ये टीपण्याचा काहीच हेतूही नसावा. कारण तिनं इतकं मागे असतानाही स्वत:चा चेहरा बऱ्याच प्रमाणात झाकला होता. पण, आता लपवून लपवणार तरी किती, शेवटी चाहत्यांनी ही बाब हेरलीच. या फोटोबाबत आणि या खासगीतील क्षणांबाबत आता नागा चैतन्य आणि शोभिता नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडेच चाहत्यांच्या नजरा आहेत. 

नागा चैतन्यच्या घरी शोभिता? 

काही महिन्यांपूर्वी शोभिताचे असेच काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ती अभिनेत्याच्या घरी असल्याचं पाहायला मिळालं. एकमेकांना वेळ देत एकमेकांसोबत ते दोघंही अगदी सहजपणे वावरत होते. त्यावेळी नागा चैतन्यनं तिला आपलं घर दाखवल्याचं म्हटल गेलं. इतकंच काय, तर काही तासांनी ही जोडी एकाच कारमधून बाहेरही पडली. शोभिताविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना नागा चैतन्यने हसत उत्तरं देणं, वारंवार त्यांचं एकत्र दिसणं या सर्व गोष्टी त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना अधिकच स्पष्ट करताना दिसत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *