Headlines

‘माझ्या मुलाच्या हाडांचा सांगाडा…’, रणदीप हुड्डाला पाहून आईची झालेली ‘अशी’ अवस्था

[ad_1]

Randeep Hooda Mother Reaction On weight loss : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा सतत त्याच्या अनोख्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. सध्या रणदीप हुड्डा हा त्याचा आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रणदीपने तब्बल 26 किलो वजन घटवले असून त्याच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याच्या आईची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा त्याच्या बहिणीने केला आहे. 

रणदीप हुड्डाची बहीण डॉ. अंजली हुड्डा ही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याची बहीण अंजली हुड्डा ही डॉक्टर आहे. रणदीपने या चित्रपटातील घटवलेले वजन आणि त्याचे झालेले ट्रान्सफॉर्मेशने हे सर्व अंजलीच्या मार्गदर्शन आणि देखरेखीद्वारे झाले आहे. आता नुकतंच अंजलीने इंडिया टुडे या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिने रणदीपने त्याचे वजन कसे घटवले आणि त्याचा तो लूक पाहिल्यानंतर आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल खुलासा केला आहे. 

वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

“माझे वडील रणबीर हुड्डा हे फार मोठे सर्जन आहेत. मी जेव्हा माझ्या वडिलांना रणदीपच्या वजन घटवणे आणि ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी माझ्याशी खूप वाद घातला. त्यांना माझा प्रचंड राग आला होता. माझी आई तर तिथेच रडायला लागली होती. माझे वडील माझ्यावर प्रचंड रागावले होते आणि त्यांनी मला तू रणदीपला प्रोत्साहन देऊ नको, असा सल्लाही दिला होता. त्यामुळे मला रणदीप आणि बाबा (रणदीपचे वडील) यांच्यातील वातावरण शांत ठेवावे लागत होते. 

“आई रडू लागली होती”

तर दुसरीकडे माझी आई रणदीपचे वजन घटवल्यानंतरची अवस्था पाहून खूपच अस्वस्थ झाली होती. ती रडत होती. मी रणदीपला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. त्याच्या हाडांचा सांगाडा झाला आहे. यानंतर मला माझ्या आईला तो अगदी व्यवस्थित आहे, त्याला काहीही झालेले नाही. आम्ही त्याच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेत आहोत, असे समजवून सांगावे लागले होते”, असा किस्सा रणदीप हुड्डाची बहीण डॉ. अंजली हुड्डा यांनी सांगितला. 

दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट शुक्रवारी 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *