Headlines

‘माझा तो व्हिडीओ डिलीट कर ना यार…’, बॉबी देओलने एम.एस.धोनीसोबतच Whatsapp chats केले लीक

[ad_1]

Bobby Deol-MS Dhoni Whatsapp Chats : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याचे चाहते आहेत. एमएस धोनी या नावाने तो ओळखला जातो. सध्या एम.एस. धोनी हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसत आहे. आयपीएल सुरु व्हायला काही दिवस शिल्लक असताना आता अभिनेता बॉबी देओलने एम.एस. धोनीबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यामुळे सध्या ते दोघेही चर्चेत आहेत. 

बॉबी देओल आणि एम.एम.धोनीच्या संवादाचे फोटो व्हायरल

अभिनेता बॉबी देओल हा अॅनिमल या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. अॅनिमल या चित्रपटामध्ये बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये त्याचे काही अॅक्शन सीन्स देखील पाहायला मिळाले. आता बॉबी देओल आणि एम.एम.धोनीच्या संवादाचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

एम.एस. धोनी काय म्हणाला?

बॉबी देओलने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने एम.एस. धोनीचा उल्लेख केला आहे. बॉबी देओलने त्याच्या ट्वीटमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत धोनीचे व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन दिसत आहे. यात त्याच्या मोबाईलमध्ये धोनी भाई असा नावाने एक मेसेज आल्याचे दिसत आहे. यात “बॉबी, माझा तो व्हिडीओ डिलीट कर ना यार…तो व्हिडीओ खूपच लाजिरवाणा आहे”, असे त्यात म्हटले आहे. यावर बॉबी देओलने हटके पद्धतीने उत्तर दिले आहे. 

बॉबी देओलचे हटके उत्तर

बॉबीने या ट्वीटसोबत हटके कॅप्शनही दिले आहे. माही भावा, ठीक आहे मी डिलीट करतो, असे बॉबी देओलने म्हटले आहे. त्यासोबतच बॉबीने #Thala #ThalaForAReason #Mahi #leak #dhoni #leakkardukya #ad असे काही हॅशटॅगही शेअर केले आहेत. बॉबीने शेअर केलेल्या या ट्वीटसोबतच चाहत्यांना काही संकेतही दिले आहेत. 

एम.एस.धोनी आणि बॉबी देओल एकत्र झळकणार जाहिरातीत

बॉबी देओलच्या ट्वीटमध्ये त्याने #ad असा उल्लेख केला आहे. त्यामुळे एम.एस.धोनी आणि बॉबी देओल हे एका जाहिरातीत एकत्र झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही जाहिरात नेमकी कशाची आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सध्या त्या दोघांचेही चाहते या ट्वीटवर कमेंट करताना दिसत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *