Headlines

‘मुक्ताच्या प्रेमात पडावं असं…’ प्रसिद्ध गीतकार-लेखकाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

[ad_1]

Mukta Barve: अभिनेत्री मुक्ता बर्वे ही आपल्या अभिनयासाठी चांगलीच ओळखली जाते. सध्या तिचं ‘चारचौघी’ हे नाटकही तुफान गाजत आहे. रोहिणी हट्टंगणी, पर्ण पेठे, कांदबरी कदम आणि मुक्ता बर्वे यांच्या सदाबहार अभिनयानं हे नाटक तूफान गाजत आहे. त्यामुळे या नाटकाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. हे नाटक 1991 साली प्रथम रंगभुमीवर आलं होतं. दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर या मातब्बर अभिनेत्रींनी या नाटकात अभिनय केला होता. स्त्रियांच्या आयुष्यातील प्रश्नांवर या नाटकातून अनेक पैलूंवर भाष्य केले गेले आहे. ज्याकाळी एका महिलेनं घटस्फोट घेणं हा विषय सहज पचनी पडणारा नव्हता. त्या काळात हे नाटक रंगभूमीवर सक्षमपणे उभं राहिलं आणि या नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळला होता. आजही हे नाटक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतं आहे आणि महिलावर्ग तसेच तरुणवर्ग, पुरूषवर्गही या नाटकाला आवर्जून उपस्थिती दर्शवतो आहे.

प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ ‘चारचौघी’ या नाटकाचे प्रयोग हे राज्यात, देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय पटलावरही जोरात सुरू आहेत. त्यातून अनेक मान्यवर कलाकारही हे नाटक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे या नाटकाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ‘ताली’ या वेबसिरिजच्या कलाकारांनीही या नाटकाला हजेरी लावली होती. लोकप्रिय गीतकार – लेखक क्षितिज पटवर्धन यानं या वेबसिरिजच्या लेखनाची धुरा सांभाळली आहे. यावेळी त्यानं मुक्ता बर्वेसह संपुर्ण कलाकार आणि टीमचं कौतुक केले आहे. यावेळी क्षितिजनं एक इन्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की त्यानं काय लिहिलंय? 

क्षितिजची पोस्ट : 

”चारचौघी पाहिलं आज. पहिल्यांदा आलं तेव्हा मी 5 एक वर्षांचा असेन. मग एकांकिका करायच्या काळात नाटकांची पुस्तकं वाचायची ओढ किंवा खोड म्हणा, लागल्यावर चारचौघी, चाहूल, ज्याचा त्याचा प्रश्न अशी सिरीयस पण दर्जेदार आशयघन नाटकं वाचली. त्यातली सगळ्यात भारी गोष्ट वाटायची पहिल्या प्रयोगाची माहिती. या संस्थेने या वेळेला इतक्या वाजता हा प्रयोग केला. दोन क्षणाकरता पानावरुन मंचावर मन जाऊन यायचं. त्यातलंच एक चारचौघी. आज 222 व्या प्रयोगाला तुडुंब भरलेल्या नाट्यगृहात पाहता आलं. नाटक फार अप्रतिम रंगलं.”

नाटकं जुनं आहे पण जून नाही हे या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यामध्ये पुरुष करत असलेली मारहाण, व्यसनं, कर्जबाजारी पणा अशी त्यांना पटकन व्हिलन बनवणारी मांडणी नाही. सोपा व्हिलन नाही त्यामुळे सोपं सोल्युशन नाही. आजचा रायटिंगच्या एका टीप मध्ये वाचलं की ‘पात्रांना सोल्युशन देऊ नका, सिच्युएशन द्या, मग ते निर्णय घेतील’ आणि त्यांचं तंतोतंत उदाहरण प्रशांत सरांच्या लेखणीत पाहायला मिळालं. ते अजून पाहायला आवडेल. आजच्या जगण्याबद्दल असं म्हणणं त्यांच्या लेखणीतून आलं तर फार मजा येईल.” 

”चंदू सर आणि थिएटर हे देखणं समीकरण आहे. मुलीच्या लग्नाच्या मांडवात बापाची जी अवस्था असते ती त्यांची प्रयोगाला असते. बहुतेक याचं कारण ते नाटक अक्षरश: पोटच्या पोरासारखं वाढवतात. त्यांनी हे नाटक सफाईने आणि तितक्याच सच्चेपणाने उभं केलंय. पहिली बाजू त्यांचा हातखंडा आहे आणि दुसरी, त्यांचं वैशिष्ट्य.” 
 
”रोहिणीताई, पर्ण, कादंबरी आणि मुक्ता. माझ्या आवडत्या चार अभिनेत्री एकत्र. सगळ्यांनी अतिशय अप्रतिम कामं केलीयेत. मुक्ताच्या एन्ट्रीला प्रेक्षकांमधून जो संपूर्ण शांततेचा लांबलचक मोमेन्ट आला ना तो मी गेली अनेक वर्ष अनेक नाटकात मिस करत होतो. (तिच्याच फायनल ड्राफ्टमध्ये तो आला होता) मुक्ताच्या आणखी प्रेमात पडावं असं काम तिने केलंय! रोहिणीताईंची असंख्य पावसाळे पाहिलेली समज, पर्णचा खराखुरा वाटावा असा संभ्रम, कादंबरीचा अप्पलपोटी नात्याचा अपेक्षारहित स्वीकार सगळंच प्रत्ययकारी! चारचौघीतले ते तिघे पण लक्ष वेधून घेतात, श्रेयस, निनाद आणि पार्थ यांनी पण कडक कामं केलीयेत. तांत्रिक बाजूही भक्कम”

‘चारचौघी’मध्ये एक प्रसंग आहे, ज्यात चारही बायका आपण कोणत्या प्रकारची साडी आहोत ते सांगतात, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, एखाद्या बाईला आपल्याच जुन्या कपाटात एक साडी दिसते जी तिने अनेक वर्षांपूर्वी घातली होती, ती त्याचा वास घेते, मग उघडून त्याचा पोत न्याहाळते, रंगावरून हात फिरवते, आणि पुन्हा नेसते. मराठी रंगभूमीला ‘चारचौघी’ नावाची इतकी सुंदर ठेवणीतली साडी आत्ता सापडलीय हे फार बरं झालंय. मराठी व्यावसायिक रंगभूमी किती सुंदर दिसू शकते हे त्यामुळेच कळतंय. मजा आली”, अशा भाषेत त्यानं फारच सुंदर पोस्ट शेअर केली आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *