Headlines

‘मी मरतेय… मला फसवल्यासारखं वाटतंय’, Archana Puran Singh च्या वक्तव्याने एकच खळबळ

[ad_1]

मुंबई : अर्चना पूरण सिंग हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. अर्चनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्तम काम केलं आहे. द कपिल शर्मा शोमधून अर्चनाला विशेष लोकप्रियता मिळाली. पण तरीही अर्चना पूरण सिंगला वाटतं की, तिला करिअरमध्ये फारशी संधी मिळाली नाही. तिला अभिनेत्री म्हणून खूप काही करायचं आहे.

अर्चनाला याबद्दल खंत आहे
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अर्चना पूरण सिंह यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली, तिने चांगली छाप पाडली आहे. ‘कुछ कुछ होता है’मधील मिस ब्रगेंझानंतर मला काय ऑफर द्यावी, असं अनेकांना वाटतं. ‘कुछ कुछ होता है’ रिलीज होऊन 25 वर्षांहून अधिक वर्षे उलटली आहेत. पण हे पात्र अजूनही माझ्या मागे आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली- “बर्‍याच लोकांना असं वाटतं की, माझ्यावर फक्त कॉमेडी भूमिकाच योग्य वाटतात. एक अभिनेत्री म्हणून मला वंचित वाटतं, माझी फसवणूक झाली आहे आणि मला चांगल्या भूमिकांची इच्छा होती. (I am dying I feel cheated Archana Puran Singh spilled pain why she said I can cry and cry too)

अर्चना पूरण सिंह पुढे म्हणाल्या, लोकं म्हणायचे की, तुम्हाला सारख्याच भूमिका मिळाल्या तर तुम्ही भाग्यवान आहात,  कारण लोकांना तुम्हाला तसंच बघायचं आहे. तथापि, मला वाटतं की, हा एका कलाकारचा मृत्यू आहे. मला आठवतंय की नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे काम मागितलं होतं. मला वाटतं की, मी या संधीचा उपयोग दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून काम मागण्यासाठी करेन.

अर्चनाला तिची दुसरी बाजू दाखवायची आहे
अर्चना पूरण सिंह पुढे म्हणाल्या, मी एक कलाकार म्हणून परफॉर्म करण्यासाठी मरत आहे. लोकांनी माझ्या कलेची एकच बाजू पाहिली आहे. माझीही एक गंभीर बाजू आहे. मी कॉमेडीपेक्षा बरंच काही करू शकते. मला रडू येतं आणि मी पण रडवूही शकते. माझी ही बाजू अजून शोधायची आहे. पण मला खात्री आहे की असा दिवस नक्कीच येईल.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *