Headlines

‘मी फक्त त्याचा जीव घ्यायचं बाकी होतं’; स्विगी डिलेव्हरी बॉयवर एवढा का संतापला अभिनेता?

[ad_1]

Ronit Roy Anger on swiggy boy : बॉलिवूड अभिनेता रोनित रॉय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सोशल मीडियावर रोनित रॉय फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात स्विगीला टॅगही केलं आहे. त्यासोबत त्यानं स्विगीवर नाराजी व्यक्त केली आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय प्रकरण आहे. 

रोनित रॉयनं ट्विटरवर लिहिलं की मी जवळपास त्या स्विगी बॉयला मारून टाकलं होतं. त्याचं कारण सांगत त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे. रोनित रॉय म्हणाला, स्विगी, मी तुमच्या एका राइडरला जवळपास मारुन टाकणार होतो. इलेक्ट्रिक मोपेड चालवणे याचा अर्थ येणाऱ्या ट्रॅफिकच्या विरुद्ध बाजूने चालवणे असा होत नाही. तुम्हाला त्यांच्या जीवाची काळजी आहे की फक्त बिझनेस आणि सगळं नेहमीसारखं सुरु राहिल?

दरम्यान, रोनितनं शेअर केलेल्या या पोस्टवर स्विगी शिवाय इतर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्विगी रिप्लाय देत म्हणाला की ‘हॅलो, रोहित, आम्ही याची आशा करतो की आमचे सगळे डिलिव्हरी पार्टनर ट्रॅफिकचे सर्व नियम फॉलो करतील. तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू, जर तुमच्याकडे काही डिटेल आहे तर कृपया आमच्यासोबत शेअर करा, जेणे करून आम्ही लगेच अॅक्शन घेऊ.’

फक्त रोनित रॉयनं नाही तर इतर अनेक नेटकऱ्यांनी स्विगी आणि झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपला या आधी देखील फटकारले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ते रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं येतात असे म्हटले आहे. तर त्याशिवाय कोणी लवकर पोहचण्यासाठी ट्रॅफिक असल्यास फुटपार्थचा वापर करत असल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यात सोशल मीडियावर येणाऱ्या इतक्या तक्रारिंनंतर त्यावर कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नाही हे पाहता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्याशिवाय वेळेत डिलिव्हरी पोहचवण्याच्या प्रयत्नात डिलिव्हरी बॉय हे स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. 

रोनितनं पुन्हा एकदा पत्नी नीलम बोसशी लग्न केलं. त्यांनी लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी हे लग्न केलं. त्या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *