Headlines

मराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला ‘जवान’, नेटकरी म्हणाले, ‘असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या’

[ad_1]

Sharad Kelkar Jawan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोही अनेकांनी पहिला आहे, सर्वत्र या चित्रपटाला फारच सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी एका मराठमोळ्या अभिनेत्यानं चक्क शाहरूख खानचा सिनेमा थिएटरमध्ये सीटवर न बसता खाली जमिनीवर पाय पसरवून पहिला आहे आणि आपलं शाहरूख खान प्रती असणारं प्रेम एक चाहता म्हणून व्यक्त केलं आहे.

सध्या त्याच्या या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टला चांगला प्रतिसाद दिला असला तरीसुद्धा काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी असंच प्रेम मराठी चित्रपटांनाही द्या असं म्हटलं आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत हे पाहुया.

सध्या मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस आहेत. बॉलिवूडच्या तोडीसतोड मराठी चित्रपट पहिले जात आहेत. त्यासोबत बॉक्स ऑफिसवरही हे चित्रपट तूफान कमाई करताना दिसत आहेत. यावर्षी बाईपण भारी देवा या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे मराठी चित्रपटानं पुन्हा एकदा शंभर कोटी कमवण्याची स्वबळावरील हिम्मत दाखवून दिलीच. हा चित्रपट सैराट आणि वेडनंतरचा बॉक्स ऑफिसवर गाजलेला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. त्यातून आता मराठी चित्रपटांनाही जोरात प्रेक्षकवर्ग गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी अभिनेता शरद केळकरच्या पोस्टनं नेटकऱ्यांना मराठी चित्रपटांची आठवण करून दिली. सध्या त्यानं त्याच्या इन्टाग्राम अकांऊटवरून हा फोटो शेअर केला आहे ज्यात तो जवान हा चित्रपट पाहण्यासाठी चक्क तो थिएटरमध्ये जमिनीवर बसला आहे. 

हे पाहून काही नेटकऱ्यांनी असंच प्रेम मराठी चित्रपटांनाही द्या असं म्हणटलंय. त्यामुळे त्याची ही पोस्ट सध्या सर्वत्र चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. यावेळी काहींनी म्हटलंय की, ‘सुभेदार चित्रपटासाठीही हे असं करा’. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ‘मी पण बसलो होतो पण दुसरा चित्रपट सुभेदार’ तर तिसऱ्या एकानं लिहिलंय की, ‘हे प्रेम सुभेदार या चित्रपटाला देखील द्या.’ तर अजून एकानं लिहिलंय की, आता फक्त मराठी चित्रपटांचाच ध्यास, हाच एकच ध्यास’

यावेळी पोस्ट शेअर करताना शरद केळकरनं लिहिलंय की, ”पायऱ्यांवर बसून का होईन पण आज ‘जवान’ पाहायचाच होता.” आणि पुढे शाहरूख खानला टॅग केलं आहे आणि त्याचं कौतुक केल आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *