Headlines

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका, तातडीने केली अँजिओप्लास्टी!

[ad_1]

Shreyas Talpade suffers heart attack : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना ही घटना घडली. शूटिंग संपल्यानंतर लगेचच तो बेशुद्ध पडला. त्याने सेटवर अक्षय कुमार देखील उपस्थित होता. 
श्रेयसने दिवसभर शुटिंग पूर्ण केलं, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सर्वांशी विनोद करत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी निघाला असताना आणि त्याने पत्नीला सांगितलं की त्याला अस्वस्थ वाटतंय. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं ठरवलं पण तो वाटेतच कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
श्रेयस तळपदे आता बरा असल्याची माहिती श्रेयसच्या टीमकडून देण्यात आली आहे. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं श्रेयसच्या सेक्रेटरीने सांगितलं आहे.
Shreyas Talpade is fine now, his secretary says, it was case of High Blood pressure and he will be discharged tomorrow. First information was that he suffered severe heart attack and has undergone angioplasty. He is admitted in Bellevue Hospital, Andheri West, Mumbai.… pic.twitter.com/IxC8OOMASu
— Pankaj Shukla (@PankajShuklaa) December 14, 2023

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *