Headlines

मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, ‘EX Boyfriend’ सोबत बांधणार लग्नगाठ

[ad_1]

Prajakta Koli Engagement: मोस्टलीसेन (Mostlysen) या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या प्राजक्ता कोळीने (Prajakta Koli) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. रविवारी सकाळी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्राजक्ताने अचानक ही घोषणा केल्यांने सेलिब्रिटींसोबत तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचबरोबर तिने दिलेल्या कॅप्शननेही लक्ष वेधून घेतले आहे. (Prajakta Koli Engagement)

प्राजक्ता कोळी गेल्या अनेक वर्षांपासून वृशांक खनालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. साखरपुड्याची घोषणा करताना तिने दोघांचा फोटो शेअर केला आहे. यावेळी दोघांच्या हातातील अंगठ्या उठून दिसत आहे. इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, वृशांक आजपासून माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्राजक्ता आणि वृशांक गेल्या कित्येक वर्षांपासून नात्यात आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांची मैत्री आहे. वृशांक हा व्यवसायाने वकील आहे. प्राजक्ताने युट्यूबर म्हणून करिअर सुरू करण्याआधीपासून वृशांकने तिला साथ दिली आहे. अनेकदा प्राजक्ता त्याच्यासोबतचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याच्या आई-बाबांसोबतही तिचे खूप छान जमते, तिच्या व्हिडिओतूनही हे अनेकदा दिसून आलं आहे. 

प्राजक्ता कोळी लोकप्रिय युट्यूबर आहे. मोस्टलीसेन असं तिच्या युट्यूबचे नाव आहे. युट्युबरवर प्रसिद्ध झाल्यानंतर तिने बॉलिवूडम व वेबसीरीजमध्येही पदार्पण केले आहे. मिसमॅच या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. रोहित सराफसोबत तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्याचबरोबर जुग जुग जिओ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले आहे. अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

प्राजक्ता कोळीने साखरपुड्याचा फोटो पोस्ट करताच अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, प्रिया बापट तर, बॉलिवूड कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मनिष पॉल, आथिया शेट्टी, सान्या मल्होत्रा, वरुण धवन यांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *