Headlines

‘तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं…’, मनीषा कोयरालासोबतच्या रोमॅन्टिक सीनवर देओलचा खुलासा

[ad_1]

Bobby Deol on Manisha Koirala’s Bad Breath : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलनं पुन्हा एकदा अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 90 च्या दशकातील लोकप्रिय ठरलेल्या बॉबीनं अनेक रोमॅन्टिक चित्रपट केले. त्यामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता देखील ‘आश्रम’, ‘रेस 3’ आणि ‘अॅनिमल’ सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत राहिल्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का की 1997 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गुप्त’ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटातील मनीषा कोयराला आणि काजोल हे कलाकार होते. बॉबी देओल हा 90 च्या दशकात चांगलाच चर्चेत होता. त्या काळातील त्याचा सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘गुप्त’. याच चित्रपटातील एक मजेशीर किस्सा बॉबीनं एका मुलाखतीत सांगितला होता. 

बॉबीनं ही मुलाखत फिल्मफेअरला दिली होती. या मुलाखतीत  बॉबीनं सांगितलं की एक रोमॅन्टिक सीन शूट करत असताना त्यानं मनीषा कोयरालाला सांगितलं की तिच्या तोंडातून वास येतोय. बॉबी म्हणाला, “मी तिच्यासोबत कम्फर्टेबल होतो. मात्र, आम्ही दोघं मित्र नव्हतो. त्यावेळी आम्ही ‘गुप्त’ या चित्रपटातील ‘बेचैनियां’ गाण्याचं शूटिंग करत होतो. तेव्हा मनीषाला तिचा चेहरा माझ्या जवळ आणायचा होता आणि माझ्या हनुवटीला चावायचं होतं. तिनं जसा तिचा चेहरा माझ्याजवळ आणला तेव्हा तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं माझं डोकं फिरलं. तिनं सीन देण्याच्या एगदी काही वेळा पूर्वी कच्च्या कांद्यासोबत चणा चाटं खाल्लं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी तो सीन कसा बसा केला. कारण त्यावेळी रोमांस ही माझ्या डोक्यात असलेली शेवटची गोष्ट होती.” 

गुप्त विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात बॉबी देओल, मनीषा कोयराला, काजोल, दिलीप ताहिल, प्रेम चोप्रा, परेश रावल, ओम पुरी यांच्या महत्त्वाच्या होत्या. बॉबीनं साहिल सिन्हा ही भूमिका साकारली होती. तर मनीषानं त्याची बेस्ट फ्रेंड शितलची भूमिका साकरली होती. काजोलनं ईशा ही भूमिका साकारली असून तिचा साहिलच्या गर्ल फ्रेंडचा रोल होता. 

हेही वाचा : ‘अवॉर्ड्ससाठी चित्रपट करत नाही…’, शाहिद कपूरनं ‘कबीर सिंग’वर केली टीका

बॉबीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा नुकताच ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याची भूमिका ही फक्त काही काळासाठी असली तरी प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेली. आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच ‘कंगुआ’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर तो ‘हाउसफुल 5’ मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *